भारतीय रुपयाचे अवमूल्यन १९४९

भारतीय रुपयाचे अवमूल्यन सर्वप्रथम सप्टेंबर २० इ.स. १९४९ रोजी करण्यात आले. हे अवमूल्यन फ्क्त अमेरिकन डॉलरच्या संदर्भात होते. त्यामुळे भारतीय रुपयाची पाउंड-स्टर्लिंगमधील किंमत न बदलता फक्त डॉलरमधील किंमत बदलली.

ब्रिटिश सरकारने आणि राष्ट्रकुलातील इतर राष्ट्रांच्या सरकारांनी आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे, भारत सरकारने आपल्या रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. या सर्व देशांचा डॉलर-प्रदेशांशी असलेल्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलाच्या बाबतीत वाढती प्रतिकूलता निर्माण झाल्याने भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला.

अवमूल्यनाचे स्वरुप

संपादन

२० सप्टेंबर इ.स. १९४९ रोजी भारतीय रुपयाची अमेरिकी डॉलरमधील किंमत ३० सेंटांवरून २१ सेंटांपर्यंत कमी करण्यात आली. तसेच भारतीय रुपयाची सोन्याच्या स्वरूपातील किंमत ०.२६८६०१ ग्रॅम शुद्ध सोन्यावरून ०.१८६६२१ ग्रॅम शुद्ध सोन्यापर्यंत कमी केली गेली. रुपयाच्या या अवमूल्यनामुळे रुपयाची ब्रिटनच्या पाउंड-स्टर्लिंगबरोबर किंमत मात्र बदलण्यात आली नाही. पाउंड स्टर्लिंगच्या बाबतीत पूर्वीचाच दर म्हणजे १ रुपया = १ शिलिंग, ६ पेन्स असाच ठेवण्यात आला.

परिणाम

संपादन

भारतीय रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारतोलाच्या बाबतीत अपेक्षित असे अनुकूल परिणाम घडून आले.