१ मे हा दिवस भारतात रणगाडा दिन (आर्मर डे) म्हणून साजरा केला जातो. १ मे १९३८ रोजी द सिंध हॉर्स या घोडदळाच्या पहिल्या रेजिमेंटचे रणगाडा दलामध्ये रूपांतर करण्यात आले होते. तेव्हापासून भारतीय लष्करातर्फे

पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स येथे १५ सप्टेंबर १९१६ रोजी रणगाड्याचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता. तेव्हापासून रणगाडा हा लष्कराचा महत्त्वाचा घटक झाला आहे.

भारतात अहमदनगर येथे आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूल आहे. तेथे रणगाडाविषयक शिक्षण दिले जाते. ३६ आठवड्यांच्या या अभ्यासक्रमात, रणगाडा चालविणे (ड्रायव्हर), रणगाड्यावरून गोळ्यांचा भडिमार करणे (गनर) आणि देखभाल-दुरुस्ती (रिपेअिरिंग आणि मेन्टेनन्स) अशा तिहेरी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंत पुढे यानंतर २८ आठवड्यांचे प्रगत शिक्षण पूर्ण करून सैनिक आपापल्या रेजिमेंटमध्ये टॅंक क्रू म्हणून रुजू होत्तात.