भारतीय नीलपंख

एक पक्षी

भारतीय नीलपंख हा रोलर कुळातला पक्षी आहे. याला चास किंवा नीलकंठ असेही म्हणतात.

भारतीय नीलपंख
Indian roller (Coracias benghalensis) Photograph by Shantanu Kuveskar.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: कोरॅसिफॉर्मिस
कुळ: कोरॅसिडी
जातकुळी: Coracias
जीव: C. benghalensis
शास्त्रीय नाव
C. benghalensis
Coracias benghalensis

भारतीय नीलपंख साधारणपणे ३१ सें. मी. आकाराचा, स्थानिक निवासी पक्षी असून हा स्थिर बसल्यावर याचा पिसारा गडद निळा दिसतो, उडताना पंख व शेपटी निळे दिसतात, छातीचा आणि पाठीचा रंग तपकिरी, पंख, शेपूट निळी, चोच काळ्या रंगाची असून भारतीय नीलपंख उडताना याच्या पंखावरील गडद व फिके निळे रंग स्पष्ट दिसतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

भारतीय नीलपंख भारतात सर्वत्र आढळून येतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार येथेही याचे वास्तव्य आहे. रंग आणि आकारावरून याच्या किमान तीन उपजाती आहेत.

भारतीय नीलपंख खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य कीटक, बेडुक, पाली हे आहे.

मार्च ते जुलै महिना हा काळ भारतीय नीलपंखचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात तो आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते.

हा पक्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा आणि ओडिशा या राज्यांचा राज्यपक्षी आहे.

चित्रदालनसंपादन करा

इतर भाषांतील नावेसंपादन करा

  • मराठी नाव : चास, नीळकंठ, नीलकंठ
  • हिंदी नाव : नीलकंठ
  • संस्कृत नाव : चाष, अपराजित
  • इंग्रजी नाव : Indian Roller
  • शास्त्रीय नाव : Coracias benghalensis

संदर्भसंपादन करा

  1. ^ जॉनसिंग, ए.जे.टी. आणि झाला, वाय.व्ही. (२००८). Coracias benghalensis. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. २५-०३-२०१७ला बघितले. Database entry includes justification for why this species is of Least Concern.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.