भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९२-९३
भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९२-जानेवारी १९९३ दरम्यान चार कसोटी सामने आणि आणि सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारताचा हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला दौरा होता. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेमध्ये संपूर्ण सदस्य म्हणून पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मायदेशातली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. दक्षिण आफ्रिकेने ५ मार्च १९७० नंतर प्रथमच मायदेशात आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती.
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९२-९३ | |||||
दक्षिण आफ्रिका | भारत | ||||
तारीख | १३ नोव्हेंबर १९९२ – ६ जानेवारी १९९३ | ||||
संघनायक | केप्लर वेसल्स | मोहम्मद अझहरुद्दीन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ७-सामन्यांची मालिका ५–२ जिंकली |
मोहम्मद अझहरुद्दीनने पाहुण्या भारतीय संघाचे नेतृत्व केले तर केप्लर वेसल्सने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. डर्बन येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सचिन तेंडुलकर तिसऱ्या पंचाद्वारे बाद ठरविण्यात येणारा पहिला क्रिकेट् खेळाडू ठरला. त्याच कसोटीमध्ये कर्णधार केप्लर वेसल्स हा कसोटी प्रकारात दोन देशांतर्फे शतक करणारा देखील पहिला वहिला खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि ५-२ या फरकाने जिंकली.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१३-१७ नोव्हेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच कसोटी खेळली.
- जिमी कूक, ओमर हेन्री, ब्रायन मॅकमिलन, जाँटी ऱ्होड्स, ब्रेट शुल्त्झ (द.आ.), प्रविण आमरे आणि अजय जडेजा (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२६-३० नोव्हेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- क्रेग मॅथ्यूस (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन२६-२९ डिसेंबर १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिकेने कसोटीमध्ये भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
४थी कसोटी
संपादन२-६ जानेवारी १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- डॅरिल कलिनन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला तसेच दक्षिण आफ्रिकेने देखील मायभूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- डेव्ह कॅलाहन आणि पेट्रस स्टीफानस डिव्हिलियर्स (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
४था सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
संपादन६वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
७वा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.