भद्रा मारुती मंदिर, हे खुलदाबाद (प्राचीन मूळ नाव भद्रावती) येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे येथे सोयगाव येथे , जवळ छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे स्थित आहे. हे मंदिर वेरुळ लेण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे स्थान आहे. येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची अजून दोन ठिकाणे आहेत ती म्हणजे प्रयागराज येथील मंदिर व आणि तिसरे मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे.[१] भद्रा मारुती मंदिर हे छत्रपती संभाजीनगर जवळील पर्यटकांचे एक आकर्षण मानले जाते. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी आणि राम नवमी अशा शुभ प्रसंगी येथे लोक लाखोंच्या संख्येने जमा होतात. [२] श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेला महत्त्व असते. हनुमानही महादेवाचे रूप असल्याने शनिवारी शिवभक्त भद्र मारुतीच्या दर्शनाला येतात.

भद्रा मारुती मंदिर, खुलदाबाद

कथा संपादन

भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्यांच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे. एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असतांना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तीगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले. ते मंत्रमुग्ध झाले. आणि अनुमानाने एक भव्य योगमुद्रा धारण केली. त्याला 'भाव समाधी' असे म्हणतात ( भाव समाधी ही योगिक मुद्रा आहे). राजा भद्रसेनाने गाणे संपविले तेव्हा प्रत्यक्ष हनुमानाची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने नमस्कार करून हनुमानाला तेथे कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान राम भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली. अशा रितीने हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे.

भद्रा मारुती संस्थान संपादन

  • भद्रा मारुती संस्थान अनेक लोक उपयोगी कार्ये करत असते. यामध्ये गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. तसेच येथे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून भक्तांसाठी डिजिटल हनुमान ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे. या डिजिटल ग्रंथामध्ये भक्ताला जो भाग ऐकायचा असेल, तो ऐकण्याची सुविधा आहे. तसेच सर्व भक्त या डिजिटल ग्रंथाचे वाचन सुलभ पद्धतीने करू शकतात.
  • उन्हापासून बचाव करण्यासाठी येथे निवारा उभारला गेला आहे.
  • येथे विविध महंतांच्या मदतीने उत्साहात रामकथांचे आयोजन होत असते. तेव्हा अन्न प्रसादाचे वाटप होते.
  1. ^ लोकसंख्या १२, उंची • ८५७ मी जिल्हा छत्रपती संभाजीनगर; Mh-20, ७९४कोड• पिन कोड• दूरध्वनी• आरटीओ कोड • ४३११०१• +०२४३७• (2019-04-19). "तीर्थक्षेत्र भद्रा मारुती - संत साहित्य - तीर्थक्षेत्र भद्रा मारुती". संत साहित्य (इंग्रजी भाषेत). 2021-02-06 रोजी पाहिले.
  2. ^ "श्रावणातल्या शनिवारी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी | eSakal". www.esakal.com. 2021-02-06 रोजी पाहिले.