रामनवमी

भगवान रामचंद्र यांचा जन्मदिवस/ हिंदू धार्मिक व्रत
(राम नवमी या पानावरून पुनर्निर्देशित)

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात.श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

श्री रामनवमीची मिरवणूक

श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

श्रीरामपंचायतन - राजा रवि वर्म्याचे एक कल्पनाचित्र

अगहन पंचमीसंपादन करा

भारतभर रामजन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जात असले तरी, ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला, त्या अयॊध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे मानतात. त्या पंचमीला अगहन पंचमी म्हणतात. (मार्गशीर्षाला हिंदीत अगहन म्हणतात!)

याला आधार म्हणजे तुळशीदासाच्या 'राम चरित मानसा'मधील खालील उल्लेख. : मंगल मूल लगन दिनु आया| हिम रिपु अगहन मासु सुहावा|| ग्रह तिथि नखतु जोगु वर बारू| लगन सोधि विधि कीन्ह विचारू||

संदर्भसंपादन करा