भगवान
भगवानदादा याच्याशी गल्लत करू नका.
ज्या व्यक्तीने जीवनातील सर्व तृष्णाचे भंजन केले आहे, अशा व्यक्तीस भगवान असे म्हणतात. भगवान = भग्ग + वान, भग्ग म्हणजे 'भंजन करणे' आणि वान म्हणजे 'तृष्णा'.
- भग्ग रागो , भग्ग मोहो ,भग्ग दोसो अनासवो ।
- भग्गस्स पापका धम्मा भगवातेन पाऊच्चति ।।
अर्थ :
- ज्या मनुष्याने राग, मोह, द्वेष व तृष्णा यांचा क्षय करून संपूर्ण अकुशल कर्म व चित्ताचा नाश केला आहे, त्या कुसलकर्मि महापुरुषाला भगवान असे संबोधतात.[१]
भारतात अनेकवेळा भगवान या शब्दाला ईश्वर, देव किंवा परमेश्वर हे समानार्थी शब्द वापरतात.
पराशर ऋषींनी भगवान या शब्दाची व्याख्या "भग"वान अर्थात ऐश्वर्यवान अशी केली आहे. भगवान या शब्दाने हा शब्द षड्ऐश्वर्यसंपन्न व्यक्तीचा निर्देश होतो. ही सहा ऐश्वर्य म्हणजे सौंदर्य, बल, बुद्धी, यश, धनसंपदा व वैराग्य होय.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ संदर्भ : Intelligent Man's Guide to Buddhism. लेखक : भदंत आनंद कौसल्यायन