पराशर

हिंदू ऋषींपैकी एक ऋषी

पराशर ऋषी हे श्री वसिष्ठ यांचे नातू होते असे पराशर यांच्याविषयी श्रीशिवलिलामृतामध्ये म्हटले आहे.

कथा संपादन करा

काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म हा शिवभक्त असतो. त्यास भस्म व रुद्राक्ष प्रिय असतात, तो शिवआराधन करण्यात सदा मग्न असे. त्यास राज्यकारभाराचा मोह नसतो. त्यामुळे राजाला राज्याची चिंता वाटते. पराशर तेव्हा राज्यात येतात, ही बातमी राजाला कळते, त्यांचे स्वागत करून राजभवनात आणतो, आपल्या पुत्राचे आयुष्य किती आहे असे विचारतो, तेव्हा पराशर पुत्राची आयु १२ वर्ष आहे असे म्हणतात व येत्या ७व्या दिवशी त्याचा मृत्यु होईल असे म्हणतात. राजा दुःखी होतो व पराशरांना यावर उपाय विचारतो, तेव्हा ते रुद्रावर्तन करण्यास सांगतात व राजपुत्राचे प्राण वाचतात.