भगवानदादा

भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक (१९१३-२००२)

भगवानदादा ऊर्फ भगवान आबाजी पालव (जन्म : १ ऑगस्ट १९१३; - ४ फेब्रुवारी २००२) हे मराठी, मराठी अभिनेते, चित्रपटदिग्दर्शक व हिंदी चित्रपटनिर्माते होते.

भगवानदादा
भगवानदादा
जन्म भगवान आबाजी पालव
१ ऑगस्ट १९१३
मुंबई
मृत्यू ४ फेब्रुवारी, २००२ (वय ८८)
दादर (मुंबई)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील आबाजी

भगवान आधी स्टंट चित्रपटांत कामे करायचे. पुढे त्यांनी स्वतःची चित्रपट कंपनी काढली. भगवान यांनी एकूण २९३ चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांनी ३४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, २ चित्रपटांची पटकथा लिहिली आहे आणि एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. बऱ्याच चित्रपटांतील त्यांनी भूमिका केलेल्या पात्राचे नाव भगवान किंवा भगवानदादा असे.

भगवानदादांचे गाजलेले चित्रपट

संपादन
  • अलबेला (अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती)
  • झनक झनक पायल बाजे (अभिनय)
  • झमेला (अभिनय, दिग्दर्शन)
  • मैने प्यार किया (अभिनय)

भगवानदादांवरील चरित्रपट

संपादन

अभिनेते भगवान यांच्यावर ’एक अलबेला’ नावाचा मराठी चित्रपट बनला आहे. त्यात भगवानदादांची भूमिका मंगेश देसाई यांनी तर गीताबालीची विद्या बालन यांनी केली आहे.,

बाह्य दुवे

संपादन