भंडारी

(भंडारी समाज या पानावरून पुनर्निर्देशित)

भंडारी ही हिंदू धर्मातील एक जात आहे. भंडारी समाजाचे लोक मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे वसलेले आहेत. महाराष्ट्रात भंडारी समाजाचे लोक मुख्यतः कोकण किनारपट्टी - मुंबई,पालघर ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटकात कारवार येथे मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत. भंडारी समाज हा हिंदू धर्माच्या क्षत्रिय वर्णामध्ये येतो. महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गोव्यात कोकणी ही त्यांची बोलीभाषा आहे. भंडारी समाजात मोरे, कित्ते, हेटकरी, शेषवंशी, इत्यादी पोटजाती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी हे भंडारी समाजाचे एक सुभेदार होते. महाराष्ट्र शासनाने भंडारी जातीचा समावेश इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात केला आहे.[]

प्रतिष्ठितांची मांदियाळी

संपादन

दानशूर भागोजी कीर याच समाजातले. भंडारी समाजात कलांचा वारसा आहे. मूर्तीकार बाबुराव सारंग यांनी घडवलेली तुकारामांचं वैकुंठगमन ही मूर्ती एकेकाळी खूप गाजली होती. त्यांचा मुलगा श्याम सारंग, राम सारंग हा वारसा पुढे चालवत आहेत. मूर्तीकार व्यंकटेश कांबळी यांचे वडील एम. डी. कांबळी यांनी लालबागला तांडवनृत्य चलतचित्र प्रदर्शन भरवलं. त्यावेळी लोकांनी पैसे देऊन हे प्रदर्शन पाहिलं. मच्छिंद्र कांबळी, अजय फणसेकर, पद्माकर शिवलकर, एस. के. बोले, प्र. ल. मयेकर, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, विजय मांजरेकर, संजय मांजरेकर, प्रवीण आमरे, रमाकांत आचरेकर, डॉ. केरकर, अण्णा वैद्य, रामनाथ पारकर, पहिला भंडारी कसोटीपटू दत्तू हिंदळेकर, संगीतकार स्नेहल भाटकर, डॉ. वि. एच. साळसकर, एम. आर. आचरेकर, रमेश भाटकर, न्यायमूर्ती एम. डी. कांबळी, प्रवीण अमरे, डॉ. संदेश मयेकर, सीए उपेंद्र चमनकर, डॉ. शुभांगी पारकर, चरित्रकार धनंजय कीर, गिरीजा कीर, अर्जुनपुरस्कार विजेता भारताचा पहिला जलतरणपटू अविनाश सारंग अशी विविध क्षेत्रांत या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मांदियाळी पाहायला मिळते. मुंबईच्या विकासात, कलेपासून समाज घडवण्यापर्यंत सर्वच स्तरांत भंडारी समाज आपलं योगदान देत आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "LIST OF CASTES IN OTHER BACKWARD CLASS OF MAHARASHTRA" (इंग्रजी भाषेत). 2014-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-07-01 रोजी पाहिले.
  2. ^ Surve, Sudarshan. "भंडाऱ्यांची भ्रमंती". https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/delusion-of-the-hypocrites/articleshow/73981949.cms. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)