अनुदिनी
अनुदिनी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा आंतरजाल आणि नोंद या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व चित्रफिती वगैरे गोष्टी इंटरनेटच्या आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार टाकलेल्या असतात. ब्लॉग सांभाळणे म्हणजे त्यातल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे. नवीन नोंदी न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
discussion or informational site published on the World Wide Web | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उपवर्ग | संकेतस्थळ, periodical (circa), समाज माध्यमे | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | महाजाल | ||
उत्पादक |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "विजेट्स"[१] द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बर्याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसऱ्या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बर्याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.
टेक्नोरती नावाचे ब्लॉग सर्च इंजिन डिसेंबर २००७ पर्यंत ११२ दशलक्ष ब्लॉग्जवर नजर ठेवून होते.
ब्लॉगचे प्रकारसंपादन करा
वैयक्तिक ब्लॉगसंपादन करा
एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर तिच्या आवडीनुसार जेव्हा मजकूर प्रसिद्ध करते, तेव्हा तो वैयक्तिक ब्लॉग असतो. हा ब्लॉग कसा असावा किंवा कसा आकर्षक करावा ही पूर्णतः त्याची इच्छा असते. वैयक्तिक ब्लॉगवर सातत्याने किंवा गरजेनुसार लेखन करता येते.
सहयोगी ब्लॉगसंपादन करा
जेव्हा एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात तेव्हा त्याला सहयोगी किंवा गट ब्लॉग म्हणतात. अनेक विषयांचे एकत्रीकरण यात वाचायला मिळते.
मायक्रोब्लाॅगिंगसंपादन करा
डिजिटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रोब्लाॅगिंग उपयोग होतो. लहान पोस्ट वाचणे किंवा टाकणे काही वेळा फार गरजेचे असते. उदा., मीटिंग, निवडणूक प्रचार, पुस्तकांचा संदर्भ इत्यादी.
संस्थात्मक ब्लॉगसंपादन करा
खाजगी किंवा सरकारी संस्थात्मक कामासाठी याचा वापर केला जातो. आपल्या कामासंबंधी अद्ययावत माहिती पोहचवण्यासाठी या ब्लॉगचे महत्त्व आहे.
इतिहाससंपादन करा
अनुदिनी ची सुरुवात १९९४ पासून झाली .जस्टिन हॉल हा पहिला आद्य ब्लॉगर होता .वेबब्लॉग ह्या शब्दाचे जनक जॉर्न बारजर हे आहेत. हा शब्द त्यांनी १७ डिसेंबर १९९७ ला बनवला. ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जबाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी हा शब्द पीटरमी.कॉम च्या साइडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्या काळात ईव्हान विल्यम ह्यांनी पायरा लॅब्ज येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रियापद दोन्ही प्रकारे वापरला ( टु ब्लॉग म्हणजे एका वेबलॉगमध्ये बदल करणे अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्दही पायरा लॅब्जने एक ब्लॉगर प्रॉडक्ट म्हणून तयार केला. हे शब्द आता चांगलेच रूढ झाले आहेत.
लोकप्रियतेमध्ये वाढसंपादन करा
एका संथ गतीने सुरुवात झाल्यावर, पुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर ब्लॉग्ज बनवण्यासाठी आणि ब्लॉग्जमध्ये वापरण्यासाठी निघालेल्या अवजारांमुळे (Blog Tools) ब्लॉग्जची लोकप्रियता शिगेला पोहोचली. WordPress, Paint.net, TypePad, Stoch.xchange ही काही अवजारे आहेत.
- ब्रूस एबलसन ह्यांनी ऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायऱ्या स्थापन झाल्या. ओपन डायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान ओपन डायरीला मिळाला.
- ब्रॅड फित्झ पॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
- अॅड्रिव्ह स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. हा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूजपेजचा मोठाच विकल्प बनून समोर आला. हा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये डायरी लॅन्डची स्थापना झाली. हा डायरी लॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहिणार्या समुदायाकडेच होता.
- ईव्हान विल्यम आणि मेग हॉरिहान ह्यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये ब्लॉगर.कॉम ची स्थापना केली. (हे संकेतस्थळ २००३ मध्ये गुगल कंपनीने खरेदी केले.)
मराठी भाषेतील ब्लॉगसंपादन करा
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर मराठी ब्लॉग दिसू लागले. आता मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे, विशेषत: वृत्तपत्रे व्यावसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यावसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रीम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते. तसेच ब्लॉगिंग शिकणार्यांसाठीही इथे मराठी भाषेत ब्लॉग उपलब्ध आहे. उदाहरणार्थ https://thankmelater.in/ हा ब्लॉग ब्लॉगर म्हणून कॅरिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आदर्श ब्लॉग आहे.
मराठी ब्लॉगरसंपादन करा
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराचा वापर बद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा. |
१)महेश राऊत यांचा प्रसिद्ध मराठी टेक ब्लॉग आहे.ब्लॉग लिंक - https://www.itechmarathi.com/
२) ब्लॉगिंग शिकणाऱ्यांसाठी, ब्लॉगर म्हणून कॅरिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी https://thankmelater.in/ हा सर्वोत्कृष्ठ ब्लॉगआहे.
३) तंत्रज्ञान, इंटरनेट, ब्लॉगिंग या विषयाबद्दल माहिती देणारा महा माहिती https://www.mahamahiti.in/ हा एक उत्कृस्ट ब्लॉग आहे.
४) ब्लॉगिंग, एसईओ (SEO), तंत्रज्ञान, इ. विषयांवर माहिती पुरविणारा ब्लॉगिंग मराठी https://www.bloggingmarathi.com/ हा एक उत्कृष्ट ब्लॉग आहे.
आर. आर. पाटील, प्रा. हरी नरके, संजय सोनवणी, एम.डी. रामटेके, अनिता पाटील, भैय्या पाटील, प्रकाश पोळ, दिपक लोकरे [१] (सह्याद्री बाणा) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. सह्याद्री बाणा या ब्लॉगने सात लाख वाचकांचा टप्पा पार केला आहे. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळणारा उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. सचिन परब, सूर्यकांत पळसकर, महेश पठाडे (खेलियाड) ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश मराठी ब्लॉगर स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत. मराठी माहिती देणारा एक चांगला ब्लॉग
पुस्तकसंपादन करा
अनुदिनी हा शब्द परंपरागत मराठीत रोजनिशी किंवा वैयक्तिक डायरी या अर्थाने रूढ आहे. ‘अनुदिनी’ या नावाचे दिलीप प्रभावळकर यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकावरून ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका निघाली होती.