बोंड अळी
बोंड अळी या अळीची मादी पिकाचे बुंध्यावर व पानांवर अंडी देते.याचे पूर्ण वाढ झालेल्या अळ्या उपजिवीकेसाठी पिकांची पाने व बोंड कुरतडून खातात.त्यामुळे उत्पन्न कमी होते.
वर्णन
संपादनही सुमारे एक इंच लांबीची असून,गुलाबी रंगाची साधारणतः असते. हिच्या अंगावर राठ केस असतात ज्यामुळे पक्षी तीला खात नाहीत.[१]या अळीचा प्रादुर्भाव सहसा कपाशीवर दिसुन येतो.
व्यवस्थापन
संपादन- दर सालाच्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतशिवार कपाशीमुक्त करणे.
- बाजार समित्या व कॉटनमिल व जेथे कापुस मोठ्या प्रमाणात साठविण्यात येतो तेथे कामगंध व प्रकाश सापळे लावणे.
- जमिनीची खोलवर नांगरणी करून ती उन्हाळ्यात तापू देणे.
- पूर्वहंगामी कापुस लावणी टाळणे व पावसाळा सुरू झाल्यावर लावणी करणे.
- लावणीसाठी साधारणतः १४० ते १६० दिवसांत येणारे कपाशीचे वाण निवडण्यात यावे.
- कपाशी पिकासोबत सापळा पीक म्हणून भेंडीची एक ओळ भोवताल लावणे.
- ऑगस्ट महिन्यापासून पिकात कामगंध सापळे लावल्याने त्याद्वारे या आळीचे पतंग आकर्षित होऊन मरतात व त्याने अळीच्या उत्पादनास आळा बसतो.
- कीटनाशके व संजीवके तसेच अन्नद्रव्ये याचे मिश्रण करून फवारणी टाळणे.
- गावपातळीवर एकाचवेळी सर्वांनी उपाययोजना केल्यास यावर नियंत्रण शक्य आहे.
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |