बॉस्फोरस पूल किंवा पहिला बॉस्फोरस पूल (तुर्की: Boğaziçi Köprüsü बॉगाझिसी कॉप्रुसु) हा तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरातील पूल आहे. हा पूल आशियायुरोप यांना बोस्फोरस सामुद्रधुनीवरून जोडणाऱ्या दोन पूलांपैकी एक आहे. (फतिह सुलतान मेहमेत पूल हा दुसरा असा पूल आहे). बॉस्फोरस पूल युरोपीय बाजूला ओर्ताकोय आणि आशियाई बाजूला बेलेर्बेयी या उपनगरांना जोडतो.

युरोपआशियाला जोडणारा बॉस्फोरस पूल

१,५६० मीटर (५,११८ फूट) लांबीचा हा पूल ३३.४० मीटर (११० फूट) रुंदीचा आहे. याच्या दोन मुख्य खांबांमधील अंतर १,०७४ मी (३,५२४ फूट) आहे तर या खांबांची उंची १६५ मी (५४१ फूट) आहे. सरासरी समुद्रपातळीपासून पूलाची उंची ६४ मी (२१० फूट) आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन