फुसबॉल-बुंडेसलीगा

(बुंडेसलीगा या पानावरून पुनर्निर्देशित)

फुसबॉल-बुंडेसलीगा (जर्मन: Fußball-Bundesliga) ही जर्मनी देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची २. फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

फुसबॉल-बुंडेसलीगा
देश जर्मनी ध्वज जर्मनी
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९६३
संघांची संख्या १८
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी २. बुंडेसलीगा
राष्ट्रीय चषक डी.एफ.बी. पोकाल
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चॅंपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते बायर्न म्युनिक
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे बायर्न म्युनिक
संकेतस्थळ bundesliga.com
२०१३-१४

इ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून बायर्न म्युनिक ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो (प्रीमियर लीगला लीगा खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे.

बाह्य दुवे

संपादन