भारतातील आसाम राज्याचा “बिहू” हा एक महत्त्वाचा सण आहे. कृषीशी संबंधित कालगणना पाहता प्रत्येक बिहूचे त्या त्या टप्प्यावर विशेष महत्त्व दिसून येते. यामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचा एकत्रितपणे समावेश होतो.[]

बिहू उत्सवासाठी सजलेले युवक युवती

रोंगाली किंवा बोहाग बिहू

संपादन

हा एप्रिल महिन्यात साजरा होतो.[] हा मुख्यत: पेरणीचा सण आहे.[] “कोंगाली किंवा काटी बिहू” हा ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो आणि तो पिकांचे रक्षण तसेच झाडाझुडपांच्या संरक्षणाची तसेच विविध गोष्टीत अंतर्भूत असलेल्या आत्मतत्त्वाची पूजा यांच्याशी जोडलेला आहे. “भोगाली किंवा माघ बिहू” हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो जो पिकांच्या कापणीच्या कामाशी जोडलेला आहे.रोंगाली बिहू हा आसामातील या तीन सणांपैकी महत्त्वाचा आहे जो आसामी नववर्षाशी तसेच वसंत उत्सवाशी संबंधित आहे. पक्वाने, संगीत आणि नृत्य यांच्या आनंदात हा सण आसामी लोक साजरा करतात. काही लोक आपल्या घरापुढे तांबे, चांदी इत्यादी धातूंची भांडी टांगतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शुभेच्छा देत, लहान मुले फुलांच्या माळा घालून गावातील रस्त्यांवरून फिरतात. या बिहूचा सोहळा सात दिवस साजरा होतो. या सात दिवसांना अनुक्रमे छोट बिहू, गोरु बिहू, मनु बिहू, कुटुम बिहू, सेनेही बिहू, मेला बिहू आणि चेरा बिहू असे म्हणले जाते. रोंगाली बिहू हा सर्जन शक्तीचा उत्सव मानला गेला आहे, त्यामुळे त्यादरम्यान केल्या जाणाऱ्या नृत्यांत ज्ञानेंद्रिये सुखावणाऱ्या अशा काही हालचालींचा समावेश असतो.[]

 
बिहू नृत्य

कोंंगाली बिहू

संपादन

याचे औचित्य निराळे आहे. त्याला काटी बिहू असेही म्हणतात, आणि तो सण साधारण ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात साजरा होतो. याला काहीसे गांभीर्य आणि थोडी अस्वस्थता असते. शेतकऱ्याची धान्याची कोठारे या दरम्यान रिकामी असतात आणि शेतात भाताचे पीक यायला सुरुवात व्हायची असते. या दिवशी पणत्या लावून त्या घरातील तुळशीपाशी, धान्याच्या कोठारांत, बागेत आणि भाताच्या शेतात ठेवतात. विकसित होणाऱ्या भातशेतीचे रक्षण करण्यासाठी शेतकरी बांबू घेऊन शेतात उभे राहतात व बांबू जोरात व वर्तुळाकार फिरवितात, आणि शेताची नासधूस करणारी प्राणी आणि दुरात्मे यांच्यापासून पिकाचे रक्षण होण्यासाठी प्रार्थना करतात. संध्याकाळी घरातील गाई-गुरांना तांदळाचा केलेला पीठा नावाचा विशेष पदार्थ केला जातो. बोडो जमातीचे लोक या दिवशी सिज्जू नावाच्या झाडापाशी तेलाचे दिवे लावतात. या बिहूच्या वेळेला विशेष करून ‘आकाशीगोंगा’ किंवा ‘आकाशबोन्ती’ म्हणजे आकाशदिवा लावला जातो. उंच बांबूच्या टोकाला दिवा बांधतात आणि तो आपल्या दिवंगत पूर्वजांना स्वर्गाचा मार्ग दाखविण्यासाठी टांगतात. भारतामधील अनेक जमाती तसेच आशिया आणि युरोपातही ही पद्धत प्रचलित असल्याचे दिसते.[]

माघ / भोगाली बिहू

संपादन

१४ जानेवारी या दिवशी सण साजरा केला जातो. यालाच भोगाली बिहू असे म्हणले जाते. हा अन्नधान्य इत्यादीशी संबंधित आहे. कोंगाली बिहू हा काटकसर किंवा कमतरता दाखविणारा अशी संकल्पना आहे.थायलंड आणि आग्नेय आशियातील ‘पोईसांगकेन’ या उत्सवाशी रोंगाली बिहू या सणाचे तंतोतंत साधर्म्य आढळते. अन्य दोन बिहू उत्सव हे आसामातील लोकांसाठी विशेष असतात. अन्य भारतीय उत्सवांप्रमाणेच बिहू हा कृषी संस्कृतीशी विशेषतः भात ( तांदूळ) या पिकाशी जोडलेला आहे.[]

 
बिहूकाळात लावलेला दिवा

शेकोटी पेटविणे आणि मिष्टान्न पदार्थ यांचआनंद घेणे हे या सणात प्रमुख आहे. गावातील तरुण मंडळी नवे बांबू, पाने यापासून आपल्या नव्या घराची बांधणी करतात आणि जुन्या निवासी झोपड्या दुसऱ्या दिबशी जाळून टाकतात. टेकली भोंगा म्हणजे घडा फोडणे आणि रेड्याच्या टकरी हे या दिवसाचे प्रमुख आकर्षण असते.उत्सवाच्या आदल्या रात्री लोक शेकोटीपाशी एकत्र जमतात. भोजन, पेयपान याचा एकत्र आनंद घेतात. या उत्सवासाठी तीळ घातलेला पीठा नावाचा तांदळाच्या पीठापासून केलेला पदार्थ[] किंवा सुंगा पीठा नावाचा पदार्थ केला जातो.[]

रोंगाली बिहू

संपादन

रंगिल्या बिहू उत्सवाला रंगाचा उत्सव असेही म्हणता येईल. सात दिवसांचा हा बिहू उत्सव अनेक संंकल्पनांंनी युक्त असा असतो. शेतकऱ्यात एक म्हण आहे. 'जार नाई गोरु सि सबातोके खोरु' याचा अर्थ ज्याच्याजवळ गोधन नाही तो सगळ्यात दरिद्री अशी जनमानसात समजूत आहे. म्हणूनच बिहूचा संबंध 'गोरु बिहू' पासून सुरू होतो. आसामी भाषेत गाय-बैलाला गोरु म्हणले जाते. चैत्र संक्रांतीच्या दिवशी गायीं-बैलांना जवळच्या तलावावर किंवा नदीवर नेऊन हळद, तेल, उडदाचे पीठ लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्या गाय-बैलांची पूजा केली जाते. केळीच्या पानावर निरनिराळी पक्वान्ने तयार करून नैवेद्य दाखवून त्यांना खाऊ घातले जाते आणि त्यांच्या भल्यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली जाते. त्यांच्या जुन्या दोऱ्या (दावणे) बदलून नवीन दोऱ्या लावल्या जातात. त्यांच्या गळ्यात कंठा घातला जातो. गोरु बिहू म्हणजे श्रीकृष्णाबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी तसेच गोधनाचा उत्सव म्हणून हे तिन्ही बिहू उत्सव आसाम राज्यात साजरे होतात.

रंगाली बिहूच्या दुसऱ्या दिवशी 'मानुह बिहू' अथवा 'चेनही बिहू' अर्थात मानव बिहू अथवा स्नेही बिहूचा उत्सव करतात. यासाठी स्त्रिया 'जोहा, बडेअ, मानिक मधुरी (सर्व आसामी नावे) इत्यादी तांदळाचे पक्वान्न तयार करतात. हे पीठा (उंडे) तांदूळ कुटून त्या पिठापासून गोड व तिखट चवीचे केलेले असतात. या दिवशी वयस्कर लोकांचा आशीर्वाद घेतला जातो.नंतर बिहूचे वाण देण्याचा कार्यक्रम होतो. बिहू वाण हे केवळ वस्त्र नाही तर हे आसामी लोकांच्या सदभावनेचे द्योतक मानतात. बिहू वाणाला सदभावनेचे कवच समजून वर्षभर सुरक्षित ठेवले जाते. मुली बिहूच्या निमित्ताने आपल्या प्रियकराला भेट स्वरूपात बिहू वाण देतात.[]

 
गोठ्यातील जनावरांंना अंंघोळ

बोहाग बिहू

संपादन

शेतीचा हंगाम या दरम्यान सुरू होतो. सामान्यत: १४ किंवा १५ एप्रिलच्या आसपास हा सण साजरा होतो.हा दिवस बंगाल, मणिपूर, नेपाळ, ओरिसा, पंजाब, केरळ आणि तमिळनाडू या प्रांतात व मिथिलानगरीत वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.आनंद आणि उत्साह यांनी सात दिवस साजरे केले जातात.शेतकरी तांदुळाची लावणी करण्यासाठी या काळात शेताची मशागत करतात आणि सगळीकडे वातावरण आनंदाने भरलेले असते. स्त्रिया या दिवसात भात आणि नारळ घालून केलेले पारंपरिक पदार्थ तयार करतात ज्यामध्ये ऋतूच्या आगमनाची विशेष चाहूल असते. []

 
बिहू नृत्य करणारे युवक-युवती

बिहूच्या प्रत्येक उत्सवाच्या निमित्ताने होणारे बिहू नृत्य हे उत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण अंग मानले जाते. या नृत्यात प्रामुख्याने युवक आणि युवती सहभागी होतात. या नृत्याला बिहू लोकगीतांची जोड दिलेली असते आणि त्यातून प्रेमभावनेचा आशय व्यक्त केला जातो.[१०] दैनंदिन आयुष्य, नवीन वर्ष यांच्याशी संबंधित गीतेही गायली जातात. रोंगाली बिहू हा सर्जन शक्तीचा उत्सव मानला गेला आहे, त्यामुळे त्यादरम्यान केल्या जाणाऱ्या नृत्यांत ज्ञानेंद्रिये सुखावणाऱ्या अशा काही हालचालींचा समावेश असतो. आग्नेय आशिया आणि चीन मधील "ताई" नृत्यप्रकाराशी या नृत्याचे साधर्म्य असल्याचे काही अभ्यासक नोंदवतात.[]

हे ही पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Roshen Dalal (2010). Hinduism: An Alphabetical Guide. Penguin Books. p. 136.ISBN 978-0-14-341421-6. 3. Jump up^ Sunita Pant Bansal (2005). Encyclopaedia of India. Smriti Books. p. 67. ISBN 978-81-87967-71-2.
  2. ^ Beena, K. A. (2019-08-01). Magic of Brahmaputra (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-64587-637-3.
  3. ^ Sharma, S. P.; Gupta, Seema (2006). Fairs and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Pustak Mahal. ISBN 9788122309515.
  4. ^ यावर जा a b • Das, Debendra Prasad Rongali Bihu through the ages, The Assam Tribune, April 14, 2007. • Dowerah, Sawpon Rongali Bihu-the spring festival of Assam, The Assam Tribune, April 14, 2007.
  5. ^ Sankalp India Foundation. "Bihu: A celebration of Assamese culture | Sankalp India Foundation". Sankalpindia.net. Retrieved 2012-12-19.
  6. ^ यावर जा a b "Magh Bihu 2020: Date, history, significance, all you need to know about the festival". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-01-16. 2020-12-30 रोजी पाहिले.
  7. ^ "Happy Magh Bihu 2020: Know More About The Festival of Pitha, Laru And Jolpan". NDTV Food. 2020-12-30 रोजी पाहिले.
  8. ^ Celebrating Nature's Bounty - Magh Bihu Archived 2012-01-17 at the Wayback Machine., Efi-news.com
  9. ^ Praphulladatta Goswami (1966). The springtime bihu of Assam: a socio-cultural study. Gauhati. OCLC 474819.
  10. ^ Sinha, Aakriti (2006). Let's Know Dances of India (इंग्रजी भाषेत). Star Publications. ISBN 978-81-7650-097-5.