बिहू नृत्य

हे भारतातील आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे.आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते.रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.[१]

स्वरूपसंपादन करा

 
बिहु नृत्य करणारे युवक-युवती

या नृत्यात प्रामुख्याने युवक आणि युवती सहभागी होतात. या नृत्याला बिहू लोकगीतांची जोड दिलेली असते आणि त्यातून प्रेमभावनेचा आशय व्यक्त केला जातो.दैनंदिन आयुष्य, नवीन वर्ष यांच्याशी समबंधीत गीतेही गायली जातात. [२] हा नृत्यप्रकार पुरुषप्रधान असून गीतांचे गायन मात्र स्त्रिया करतात. हे नृत्य जलद गतीने आणि चपळाईने केले जाते तसेच कमरेच्या हालचाली यात विशेषत्वाने केल्या जातात.[३] या नृत्या चेहरा-या वरील हावभाव हेही महत्त्वाचे मानले जातात. [२] रोंगाली बिहू हा सर्जन शक्तीचा उत्सव मानला गेला आहे, त्यामुळे त्यादरम्यान केल्या जाणा-या नृत्यात ज्ञानेंद्रिये सुखावणा-या अशा काही हालचालींचा समावेश असतो.[४]

आग्नेय आशिया आणि चीन मधील "ताई" नृत्यप्रकाराशी या नृत्याचे साधर्म्य असल्याचे काही अभ्यासक नोंदवतात.[५]

सादरीकरणसंपादन करा

उत्सवादरम्यान मोकळी शेते, व्यासपीठे वा झाडांच्या रायांमध्ये हे नृत्य सादर केले जाते आणि आनंद घेतला जातो. [२] मासिक धर्माच्या काळात महिलांनी या नृत्यास उपस्थित राहू नये अशीही एक समजूत प्रचलित आहे.[६]

प्रकारसंपादन करा

गारो बिहू आणि खासी बिहू असे याचे दोन प्रकार आहेत.[३]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ Sharma, Kshitiz (2014). Introduction to Tourism Management (इंग्रजी भाषेत). McGraw Hill Education (India) Pte. Limited. ISBN 9781259026805.
  2. a b c Mohapatra, J. (2013-12). Wellness In Indian Festivals & Rituals (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 9781482816907. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. a b Laveesh, Bhandari (2009-09). Indian States At A Glance 2008-09: Performance, Facts And Figures - Assam (इंग्रजी भाषेत). Pearson Education India. ISBN 9788131723326. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Das, Debendra Prasad Rongali Bihu through the ages, The Assam Tribune, April 14, 2007. • Dowerah, Sawpon Rongali Bihu-the spring festival of Assam, The Assam Tribune, April 14, 2007.
  5. ^ Gogoi, Pushpa (1996). Tai of North East India (इंग्रजी भाषेत). Chumphra Printers and Publishers.
  6. ^ Deori, Saranan (2002). Religious Practices of the Deoris (इंग्रजी भाषेत). Bina Library.