बिमारु राज्ये
बिमारु (इंग्रजी:BIMARU) हा शब्द मूलतः बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या भारतातील चार राज्यांच्या इंग्रजी नावाच्या पहिल्या अक्षरापासून तयार करण्यात आलेला आहे. आशिष बोस यांनी इ.स. १९८० च्या दशकाच्या मध्यात हा 'परिवर्णी शब्द' पहिल्यांदा वापरला होता. बिमारू हा शब्द बिमारी किंवा आजारपणाशी संबंधित आहे.[१][२][३]
ऐतिहासिक पार्श्वभूमी
संपादनबिमारु हा शब्द इ.स. १९८० च्या दशकाच्या मध्यात आर्थिक विश्लेषक आशिष बोस यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सादर केलेल्या पेपरमध्ये वापरला होता.[४] अनेक समित्यांचा अभ्यास तसेच संयुक्त राष्ट्राच्या अभ्यासासह, असे दिसून आले की बिमारु राज्यांच्या कामगिरीचा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जी. डी. पी. वाढीच्या दरावर नकारात्मक परिणाम झाला आहे.[५][६]
अलीकडील घडामोडी
संपादनअलीकडच्या काळात यापैकी काही राज्यांनी आर्थिक प्रगतीत मोठा वेग घेतला आहे. जरी यापैकी काही राज्यांनी चांगला विकास दर अनुभवला असला, तरीही ते इतर प्रगतीशील राज्यांपेक्षा मागे आहेत. २००६-२००७ या कालावधीत बिहारचा GSDP ८०% वाढला, जो मागील दोन वर्षांच्या तुलनेत जास्त होता आणि त्या कालावधीसाठी भारत सरकारने नोंदवलेल्या सर्वोच्चांकापैकी एक होता. त्यांनी अधिकाधिक शिक्षकांची नियुक्ती करून आणि सॉफ्टवेर पार्क उघडून शिक्षण आणि निपुनतेवर अधिक भर दिला आहे. मोठ्या युवा लोकसंख्येमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोक भारतीय लष्कर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी), भारतीय वायू सेना (आयएएफ) आणि इतर अनेक निमलष्करी (पॅरा मिलिटरी) दलांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अलीकडे ही राज्ये पायाभूत सुविधा, आयटी पार्क विकसित करून आणि व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले आमंत्रण देऊन त्यांच्या सुधारणेसाठी काम करत आहेत. तसेच मध्य प्रदेश संयुक्त राष्ट्राच्या सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे जी. डी. पी. वाढीच्या विकास क्रमवारीत 225%च्या विक्रमासह दुसऱ्या स्थानावर आहे.[७]
संदर्भ
संपादन- ^ "Don't call them Bimaru states now". hindustantimes.com. 19 July 2010. 2011-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "BIMARU towns fuelling India's economic resurgence". economictimes. September 24, 2010. ५ मार्च २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra faring worse than BIMARU states". hindustantimes. December 1, 2010. 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Ashish Bose – The man who coined the term 'Bimaru'". Mint. 16 November 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "'Bimaru' states hampers India's growth". द टाइम्स ऑफ इंडिया. 7 September 2005. July 25, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "BIMARU or bimari?". The Hindu. 12 August 2005. 16 May 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "statewise gdp" (इंग्रजी भाषेत). 2012-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.