बाबा हरदेव सिंह
बाबा हरदेव सिंग (२३ फेब्रुवारी, इ.स. १९५४ : दिल्ली, भारत - १३ मे, इ.स. २०१६ : मॉंत्रियाल, कॅनडा) हे शीख आध्यात्मिक गुरू होते. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि १९७५ मध्ये त्यांनी निरंकारी यूथ फोरमची स्थापना केली.
Indian spiritual teacher | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २३, इ.स. १९५४, इ.स. १९५४ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मे १३, इ.स. २०१६ Beauharnois | ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
| |||
हरदेव सिंग यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी दिल्लीत गुरबचन सिंग आणि कुलवंत कौर यांच्या घरी झाला. [१] [२] त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण यादवंद्र पब्लिक स्कूल, पटियाला , पंजाब येथून पूर्ण केले आणि नंतर शालेय शिक्षण रोझरी पब्लिक स्कूल, संत निरंकारी कॉलनी, दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली . [३]
1975 मध्ये, त्यांनी दिल्लीतील वार्षिक निरंकारी संत समागम दरम्यान सविंदर कौरशी लग्न केले. [३]
२४ एप्रिल १९८० रोजी दहशतवाद्यांनी निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख सद्गुरू बाबा गुरूबचन सिंह आणि हरदेव सिंग यांच्या वडिलांची हत्या केली. २७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंह यांना मिशनचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्यासाठी बाबा हरदेव सिंह यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या.
शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे बाबा हरदेव सिंह यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर पसरवला.
कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असताना, १३ मे, २०१६ रोजी, गाडी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ
संपादन