Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील साध्वी बलात्कारप्रकरणी ८०० गाड्यांच्या ताफ्यासह हजर झालेल्या राम रहीम पंचकूलाच्या सीबीआय विशे़ष न्यायालयावे २० वर्षांची शिक्षा ठोठावली.

राम रहीमवर आरोप करणाऱ्या बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात बाबाने रात्री गुफेमध्ये बोलावून दुष्कर्म केल्याचे तिने म्हटले होते. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास १०० एकर परिसरात पसरलेल्या गुरमीत राम रहीम यांच्या आश्रमाच्या मधोमध काचेचे एक भवन आहे, त्याला बाबाची गुफा असे महटलं जातं.

गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. बाबाची गाडी थेट या दरवाजांपर्यंत पोहोचते. गुफेत प्रवेश करताना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर केला जातो. गुफेच्या रस्त्यात बंदुक घेऊन काही लोक तैनात असतात. बाबाच्या हजारो महिला भाविकांपैकी काही खास भाविकांनाच या गुफेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे. या महिला भाविक साध्वीसारख्या वेशभूषेत असतात. बाबाला जेवण भरवण्यापासून सकाळ-संध्याकाळ स्टेजवर नेण्या-आणण्याचं काम या महिला भाविक करतात. बाबाच्या प्रवचनाच्या वेळीही या महिला भाविकांना बसण्याची विशेष सोय असते. प्रवचन हॉलमधील सर्व व्यवस्था या महिला भाविकच सांभाळतात तर हॉलच्या बाहेरील भागात पुरूष कारसेवक काम करतात.

बाबाच्या या गुफेत विशेष व्यक्तींची भेट घेण्यासाठी एक रूम आहे. अनेक देशांमध्ये थेट बोलता यावं यासाठी याच रूममध्ये हॉटलाइन उपलब्ध आहे. या गुफेत ऐशोआरामाची प्रत्येक वस्तू आहे. बाबाच्या आश्रमात सीसीटीव्ही तर आहेच शिवाय एक कंट्रोल रूम आहे. या रूममध्ये देशातील सर्व चॅनलची मॉनेटरिंग आणि बाबाशी संबंधित बातम्या रेकॉर्ड करण्याची सिस्टीमही आहे.

जाणून घेऊ राम रहीमविषयी-

गुरूमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.[२]

कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम-

15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरूसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.

संदर्भसंपादन करा

दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या नातेवाईकांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितलं आहे की, शारिरीक संबंधांचा आरोप झाल्यानंतर राम रहीम हायप्रोफाईल तरुणींना सिरसा येथे बोलवत असे. इतकंच नाही तर कधी कधी तरुणींसाठी महिन्यातले 15 ते 20 दिवस मुंबईला शिफ्ट होत असे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भूपिंदर सिंह गोरा यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

तरुणींची व्यवस्था करण्यापासून ते पुढील सर्व गोष्टींची जबाबदारी हनीप्रीतवर असे. त्यांनी सांगितलं की, राम रहीम जास्तीत जास्त वेळ महिलांमध्येच घालवत असे. लाखो महिला अनुयायी उपस्थित असतानाही राम रहीम खुलेपणाने नग्न सेक्स वर्कर्ससंबंधी चर्चा करायचा.

भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितल्यानुसार, राम रहीम प्रेमाच्या तीन पद्धती आहेत असं सांगायचा. यानुसार मिजाजी (वन नाइट स्टॅंण्ड), हाकिकी (खरं प्रेम) आणि रुहानी (दैवी प्रेम) असे तीन प्रकार आहेत असं राम रहीम सांगायचा. 'गुहेत एकदा एका महिला किंवा तरुणीची भेट घेतल्यानंतर पुन्हा तो तिला भेटायचा नाही. सोबतच त्याला भेटण्यासाठी इच्छुक असणा-या महिलांवर त्याची नजर असायची. सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी बाबा धार्मिक गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचं कारण महिलांना देत असते. पण खरं सांगायचं तर आजपर्यंत त्याने साधं एका धार्मिक पुस्तकालाही हात लावलेला नाही', असं भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितंल आहेदोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. सध्या राम रहीम रोहतक कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान राम रहीमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंचकुला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला गुरमीत राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. .[३]

संदर्भसंपादन करा

दहशतवादी ओसामा बिन लादेनपेक्षाही बाबा राम रहीम जास्त धोकादायक' लादेन सारखे दहशतवादी हे काही लोकांची हत्या करतात पण बाबा राम रहीमसारखे लोक हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात. एकीकडे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी बाबा राम रहीम यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असताना इतर धर्मगुरूंकडून मात्र बाबा राम रहीम यांच्यावर टीका होत आहे. जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी तर राम रहीम यांची तुलना ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याशीच केली आहे.

ओसामा बिन लादेन या दहशतवाद्यापेक्षाही बाबा राम रहीम हे धोकादायक आहेत असं वक्तव्य जैन मुनी तरूण सागर महाराज यांनी केलं आहे. लादेन सारखे दहशतवादी हे काही लोकांची हत्या करतात पण बाबा राम रहीमसारखे लोक हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची हत्या करतात. त्यामुळेच हे असले लोक एखाद्या कुख्यात दहशतवाद्यापेक्षाही जास्त धोकादायक आहेत असे तरूण सागर महाराज यांनी म्हटले आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे.

स्वतःला संत आणि बाबा म्हणवणारे राम रहीमसारखे लोक हे लादेनपेक्षा धोकादायक आहेत, त्यांना शिक्षा होणे योग्यच आहे. न्यायव्यवस्था आपले काम योग्य पद्धतीने करते आहे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया तरूण सागर महाराज यांनी दिली आहे.

सीबीआय न्यायालयातर्फे जी शिक्षा बाबा राम रहिम यांना सुनावली जाईल ती त्यांना व्हायलाच हवी आणि आपण सगळ्यांनीच न्यायव्यवस्थेचा आदर करायला हवा. कोर्टाने एखादा निर्णय दिल्यावर जर लोक हिंसाचार माजवत आहेत, असे होणार असेल तर मग कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा अर्थच काय उरतो? जे लोक तोडफोड करत आहेत त्यांचा न्यायालय आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही का? देशाच्या संपत्तीची नासधूस करणे म्हणजे स्वतःची संपत्ती संपविण्यासारखेच आहे असेही तरूण सागर यांनी म्हटले.

सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.[४] मासिक पाळीचं कारण देऊन बाबा राम रहीमच्या तावडीतून सुटका करायच्या साध्वी एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी राम रहीमबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गुरमीत राम रहीमविरोधात करण्यात येणारे काही आरोप हे गंभीर स्वरुपातील आहेत. पूर्वी डेरातच राहणा-या एका साध्वीनं मंगळवारी एका टीव्ही चॅनेलसोबत केलेल्या बातचितदरम्यान असा गौप्यस्फोट केला आहे की, राम रहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी राम रहीमच्या तावडीतून सुटका केल्याचं तिनं सांगितले.  

या साध्वीनं अशीही माहिती दिली की, राम रहीमच्या बोलवण्यावरून मुली गुहेत तर जायच्या, मात्र परत येण्यास असहाय्य असल्याने त्या तोंडातून 'ब्र' देखील काढू शकत नव्हत्या. गुहेत जाणा-या मुलींना धमकावण्यात यायचे. जर तुम्ही राम रहीमची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमच्या नातेवाईकांना जीवे मारण्यात येईल, अशा पद्धतीनं मुलींना घाबरवण्यात यायचे. एकेकाळी डेराशी संबंध असलेल्या या साध्वीनंही एका रात्री तिलाही राम रहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर राम रहीमच्या घाणरेड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिनं मासिक पाळीचं कारण दिलं व बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. राम रहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेरातील साध्वी अनेकदा मासिक पाळीचं कारणं देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीनं सांगितले आहे.

'शाळा-अनाथ आश्रमातील मुलींचा बलात्कार' डेराचा पूर्वीचा अनुयायी गुरदास सिंह तूर यांनी असा आरोप केला आहे की, गुरमीत राम रहीम डेराच्या शाळा व अनाथ आश्रमातील मुलींवर बलात्कार करायचा. डेराच्याच हॉस्पिटलमध्ये या पीडित मुलींचा गर्भपातही केला जायचा. गुरदास यांनी सांगितले की, जेव्हा ते डेराचे सदस्य होते तेव्हा तीन गर्भवती मुलींचा त्यांच्यासमोर गर्भपात करण्यात आला. शिवाय, बाबा राम रहीम ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा, अशी माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

बाबा राम रहीमसंदर्भातील 10 खळबळजनक खुलासे 1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं. 2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. 3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे. 5. राम रहीमवर जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे. 6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे. 7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे. 8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं. 9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत. 10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे. [५] सीबीआय कोर्टासमोर गुरमीत राम रहीम सिंगला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्याची शक्यता डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे.

 डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे.  गुरमीत राम रहीम सिंग याला बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश गुरमीत राम रहीम सिंगला शिक्षा सुनावणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीमला दोषी ठरवण्यात आले आहे, ते दुर्मिळातील दुर्मिळ असे प्रकरण आहे व यामध्ये कठोरातील कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. हे केवळ बलात्काराचे प्रकरण नाही तर पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचे हे गंभीर प्रकरण आहे. 15 वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहीम सिंगला दोषी ठरवण्यात आले आहे. 

एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, 'सामान्य प्रकरणापेक्षा हे प्रकरण वेगळे आहे. यात पीडितेसोबत अनेकदा जबरदस्ती करण्यात आली आहे'. सीबीआयनं कोर्टात केलेल्या युक्तीवादानुसार, गुरमीत राम रहीम सिंगनं 2 महिला अनुयायांवर अनेकदा बलात्कार केला. दरम्यान, अधिका-यांनी असेही सांगितले की, बाबा राम रहीम आणि पीडित महिलांमध्ये जवळचे संबंध होते. विश्वास व श्रद्धेचे हे प्रकरण होते. या महिला राम रहीमला गुरू मानत होत्या. मात्र राम रहीमने महिला अनुयायांसोबत आपल्या आध्यात्मिक ताकदीचा गैरवापर केला. सोबतच या पीडित महिलांचा विश्वासघातही केला. यामुळेच गंभीर स्वरुपाचा हा गुन्हा असून यात कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असेही अधिकारी म्हणालेत

गुरमीत राम रहीमला पळवण्याचा होता कट दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सात जणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत.

समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले- पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या.

सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. [६][७] राम रहीम यांचे समर्थक जमा करत आहेत दगड आणि पेट्रोल, चंदिगड आणि हरियाणामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती गुरमीत राम रहिम सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बलात्कार आरोप प्रकरणी न्यायालय 25 ऑगस्ट रोजी आपला निर्णय सुनावणार आहे. 2002 ते 2017 : असा आहे डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याचा जेलपर्यंतचा प्रवास डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट )न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी न्यायालायने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता. 2002मध्ये हे प्रकरण उजेडात आले होते. 2002 पासून ते आतापर्यंतच्या या प्रकरणातील घडामोडींवर एक नजर टाकूया

गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण 2002 पासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम

एप्रिल 2002 : सिरसातील डेरा सच्चा सौदा येथे महिला अनुयायांचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार करणारे निनावी पत्र पंजाब व हरियाणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिण्यात आले होते.

मे 2002 : हायकोर्टानं सिरसा जिल्हा आणि सत्र न्यायालयाला डेरा सच्चा सौदाविरोधात पत्राद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले.

सप्टेंबर 2002 : महिला अनुयायांचं लैंगिक शोषण होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर हायकोर्टानं पुढील चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

डिसेंबर 2002 : सीबीआयनं डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमविरोधात बलात्कार व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जुलै 2017 : सीबीआयनं अंबाला कोर्टात गुरमीत राम रहीमविरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात 1999 ते 2001 यादरम्यान दोन साध्वींचे (महिला अनुयायी) लैंगिक शोषण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

सप्टेंबर 2008 : सीबीआयच्या विशेष न्यायालयानं गुरमीत राम रहीमविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

2009 ते 2010 दरम्यान तक्रारकर्त्यांनी कोर्टासमोर आपला जबाब नोंदवला

एप्रिल 2011 : गुरमीत राम रहीमविरोधातील खटला प्रकरण अंबाला कोर्टातून पंचकुला सीबीआय कोर्टाकडे वर्ग करण्यात आला.

जुलै 2017 : विशेष सीबीआय न्यायालयाकडून नियमित सुनावणीचे आदेश

ऑगस्ट 17, 2017 : फिर्यादी व बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी शिक्षा सुनावण्यासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित केली.

ऑगस्ट 25, 2017 : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले.

ऑगस्ट 28, 2017 : गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

गुरमीत राम रहीमला पळवण्याचा होता कट दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सात जणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत.

समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले- पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या.

सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर गुरमीत राम रहीमला 28 ऑगस्टला शिक्षा सुनावण्यात आली आहे.[८]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ http://www.lokmat.com/national/baba-ram-rahim-kept-daughter-room-made-me-sleep-outside/
  3. ^ http://www.lokmat.com/national/ram-rahim-never-talked-about-religious-book-says-naked-sex-workers-front-millions-women/
  4. ^ http://www.lokmat.com/national/ram-rahim-more-dangerous-terrorists-osama-laden-said-tarun-sagar-ji-maharaj/
  5. ^ http://www.lokmat.com/national/new-revelation-related-ram-rahim-and-dera-sacha-sauda/
  6. ^ http://www.lokmat.com/national/honeypreet-and-ram-rahim-together-see-naked-believing-guptas-disclosure/
  7. ^ http://www.lokmat.com/national/possibility-life-imprisonment-gurmeet-ram-rahim-singh-cbi-court-likely-be-sentenced-life/
  8. ^ http://www.lokmat.com/national/journey-dera-sacha-sauda-chief-gurmeet-ram-rahim-prison/