बाणगंगा महोत्सव [] हा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव या नावाने सुद्धा ओळखला जातो. [] हा महोत्सव देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मलबार हिल्स, मुंबई येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात दोन दिवसीय संगीत महोत्सव साजरा केला जातो.[]

सुरुवात

संपादन

मलबार हिल्समधील वाळकेश्वर मंदिराच्या संकुलात असलेल्या बाणगंगा टाकी हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.  “Live Music To Save Heritage” []या संकल्पनेच्या आधारित महोत्सवाचे आयोजन बाणगंगा तलावाकाठी केले जात असे. इ.स. १९९२ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात भारतातील नामवंत कलाकार हरिप्रसाद चौरसिया ,[] झाकिर हुसेन [] यांच्या मैफिली आणि संगीत सादरीकरणाचा साक्षीदार आहे, त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. तथापि इ.स. २००८ पासून ध्वनिप्रदूषणाच्या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने या महोत्सवचे ठिकाण बदलून एशियाटिक सोसायटी , टाउन हॉल , मुंबई येथे हलवण्यात आले. सोबतच महोत्सवचे ‘बाणगंगा फेस्टिव्हल’ या नावात बदल करून ‘मुंबई संस्कृती’ असे ठेवण्यात आले.

प्रमुख पर्यटक आकर्षणे

संपादन

वाळकेश्वर मंदिर

संपादन

वाळकेश्वर हे दक्षिण मुंबईतील एक समृद्ध क्षेत्र आहे. हे वाळकेश्वर मंदिर आणि बाणगंगा टाकीसाठी लोकप्रिय आहे. हे मंदिर बाणगंगा कुंडाच्या अगदी जवळ भगवान शिवाला समर्पित आहे.[]

श्री काशी मठ

संपादन

टाक्याच्या पश्चिमेला गौडा सारस्वतांचे प्रसिद्ध धार्मिक आसन असलेल्या श्री काशी मठाची शाखा आहे. मठ परिसरात दोन समाधी आहेत. 1.श्री माधवेंद्र तीर्थ (७ वे स्वामीजी, समाधी वर्ष १७७५: श्री स्वामीजी, ते जिवंत असताना समाधीत प्रवेश केला असे म्हणतात आणि म्हणून ही एक शक्तिशाली जीव समाधी आहे) आणि श्री वरदेंद्र तीर्थ (१८वे स्वामीजी: समाधी वर्ष १९१४)

संदर्भ

संपादन
  1. ^ "Banganga fest may be revived after 4-yr gap". मिड-डे (English भाषेत). 11 June 2012. 2 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Drama to the duet". हिंदुस्तान टाइम्स (English भाषेत). 25 April 2021. 2 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "मुंबई संस्कृती आभासी (virtual) संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन". माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन (Marathi भाषेत). 9 February 2022. 2 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Rediscovering the Cultural Heritage of Mumbai Through Live Music". आउटलुक (English भाषेत). 8 April 2021. 2 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Banganga Festival to revive city's heritage". dnaindia.com (English भाषेत). 21 November 2013. 2 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "Music to soothe the soul". द टाइम्स ऑफ इंडिया (English भाषेत). 12 January 2002. 2 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "वाळकेश्वर येथील पुरातन बाणगंगा मंदिर". लोकसत्ता (Marathi भाषेत). 19 September 2015. 6 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)