बलरामपूर
बलरामपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या बलरामपूर ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बलरामपूर उत्तर प्रदेशच्या अवध भागात राजधानी लखनौच्या १६० किमी ईशान्येस भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित आहे. २०११ साली बलरामपूरची लोकसंख्या सुमारे ८१ हजार होती. श्रावस्ती हे बौद्ध धर्मामधील एक पवित्र ठिकाण येथून केवळ १६ किमी अंतरावर आहे.
बलरामपूर | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | बलरामपूर |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३४८ फूट (१०६ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ८१,०५४ |
अधिकृत भाषा | हिंदी |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |