बकिन पर्टिन
बकिन पर्टिन (१ मे १९४२ – ५ जानेवारी १९९६) हे भारतीय राजकारणी होते.[१][२] पर्टिन अरुणाचल प्रदेशातील आदि जातीचे होते.[३] ते १९७७ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांपैकी एक होते आणि नंतर राज्याच्या विधानसभेचे सदस्य बनले.
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १, इ.स. १९४२ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी ५, इ.स. १९९६ गुवाहाटी | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
१९७७ ची सार्वत्रिक निवडणूक ही पहिलीच वेळ होती जेव्हा अरुणाचल प्रदेश या नवीन केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेचे दोन सदस्य निवडून आले.[४] पर्टिन यांनी अरुणाचल पूर्व मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.[५] त्यांनी २८,५५७ मते (५६.३४%) मिळवून जागा जिंकली.[५][६]
१९८० आणि १९८४ च्या निवडणुकीत त्यांनी अरुणाचल पूर्व लोकसभा जागा जिंकण्याचा प्रयत्न केला; पण ते हरले.[७] पर्टिन यांनी १९८४ ची अरुणाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली व ५१.४२% मतांनी ती जागा जिंकली.[८]
जनता दलाची स्थापना झाल्यावर पेर्टिन हे पक्षाच्या अरुणाचल प्रदेश युनिटचे सचिव झाले.[९] त्यांनी अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या १९९० आणि १९९५ निवडणुकीत भाग घेतला पण त्यांचा पराभव झाला.[१०][११]
संदर्भ
संपादन- ^ India News and Feature Alliance. India Who's Who. New Delhi: INFA Publications, 1997. p. 49
- ^ Lok Sabha Debates. Lok Sabha Secretariat., 1996. pp. xvii–xviii
- ^ The Election Archives, Vol. 65–70. Shiv Lal, 1982. p. 139
- ^ Begi, Joram. Education in Arunachal Pradesh Since 1947: Constraints, Opportunities, Initiatives and Needs. New Delhi: Mittal Publ, 2007. p. 17
- ^ a b Election Commission of India. Statistical Report on General Elections, 1977 to the Sixth Lok Sabha Archived 2013-01-27 at the Wayback Machine.
- ^ Chaube, Shibani Kinkar. Electoral Politics in Northeast India. Madras: Universities Press, 1985. p. 193
- ^ Election Commission of India. Statistical Report on General Elections, 1984 to the Eighth Lok Sabah Archived 2014-07-18 at the Wayback Machine.
- ^ Election Commission of India. Statistical Report on General Elections, 1984 to the Legislative Assembly of Arunachal Pradesh Archived 2013-01-27 at the Wayback Machine.
- ^ Election Archives and International Politics, Eds. 175–176; Eds. 179–184. Shiv Lal, 1991. p. 72
- ^ Election Commission of India. Statistical Report on General Election, 1990 to the Legislative Assembly of Arunachal Pradesh Archived 2013-11-04 at the Wayback Machine.
- ^ Election Commission of India. Statistical Report on General Election, 1995 to the Legislative Assembly of Arunachal Pradesh Archived 2013-01-27 at the Wayback Machine.