फ्लाईंग रानी
फ्लाईंग रानी ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या सुरत शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व सुरत स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते सुरत दरम्यानचे २६३ किमी अंतर ४ तास व ४० मिनिटांत पूर्ण करते. फ्लाईंग रानी गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे डबलडेकर आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत.
तपशील
संपादनवेळापत्रक
संपादनगाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१२९२२ | सुरत – मुंबई सेंट्रल | ०५:२५ | १०:१० | रोज |
१२९२१ | मुंबई सेंट्रल – सुरत | १७:५५ | २२:३५ | रोज |