फ्रँकलिन पियर्स

युनायटेड स्टेट्सचे १४ वे अध्यक्ष (१८५३-५७)
(फ्रॅंकलिन पियर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रॅंकलिन पियर्स (मराठी लेखनभेद: फ्रॅंकलिन पीयर्स ; इंग्रजी: Franklin Pierce ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १८०४ - ८ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात न्यू हॅंपशायर संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.

फ्रॅंकलिन पियर्स
FranklinPierce.png

सही फ्रँकलिन पियर्सयांची सही

पियर्स पेशाने वकील होता. इ.स. १८४६ ते इ.स. १८४८ या कालखंडातील मेक्सिकन-अमेरिकन युद्धात तो स्वयंसेवक म्हणून सैन्यात भरती झाला. मेक्सिको सिटीच्या लढाईत विजयी झालेल्या अमेरिकी फौजांच्या एका ब्रिगेडीचे नेतृत्व त्याने केले होते.

अध्यक्षीय कारकिर्दीत त्याने अप्रत्यक्षरित्या गुलामगिरी-धार्जिण्या असणाऱ्या इ.स. १८५४ च्या कॅन्सस-नेब्रास्का कायद्यास पाठिंबा दिला, तसेच त्याच्या राजवटीने ऑस्टेंड मॅनिफेस्टो पुरस्कारला. या दोन धोरणांमुळे उत्तरेकडील संस्थानांमध्ये पियर्स प्रशासनाच्या लोकप्रियतेस तडा गेला. या दोन धोरणांमुळे अध्यक्षीय कारकीर्द डागाळली गेलेला पियर्स अमेरिकी इतिहासातील सर्वांत अप्रिय ठरलेल्या अध्यक्षांपैकी एक मानला जातो. त्याच्या खालावलेल्या लोकप्रियतेमुळे डेमॉक्रॅटिक पक्षाने इ.स. १८५६ च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याला डावलून जेम्स ब्यूकॅनन याचे नामांकन पुढे केले.

बाह्य दुवेसंपादन करा

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-01-22. 2011-08-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "फ्रँकलिन पियर्स: अ रिसोर्स गाइड (फ्रँकलिन पियर्स: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)