फैसलाबादचा पाकिस्तान-भारत कसोटी सामना २००६
भारताच्या २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना फैसलाबादच्या इकबाल स्टेडियममध्ये खेळला गेला.
भारताचा संघ
संपादनपाकिस्तानचा संघ
संपादनथोडक्यात वर्णन
संपादनलाहोरच्या खेळपट्टी सारखीच खेळपट्टी असल्याने या सामन्यातही निकाल अपेक्षित नव्हताच. पाकिस्तानने परत नाणेफेक जिंकुन पाकिस्तानने फलंदाजी घेतली व पहिल्या डावात ५८८ धावा केल्या. उत्तरादाखल भारताने ६०३ धावा केल्या.
दुसऱ्या डावात पाकिस्तानने ८ बाद ४९० धावा करून डाव घोषित केला व भारतापुढे १०-१५ शटकात ४७६ धावा करायचे 'आव्हान' ठेवले. वेळ संपली तेव्हा भारताने ८ शटकात बिनबाद २१ धावा केल्या.
थोडक्यात धावफलक
संपादनपहिला डाव
संपादन- पाकिस्तान: ५८८ (शहीद आफ्रिदी-१५६, इंजमाम उल-हक-११९*, रुद्र प्रताप सिंग-४/८९)
- भारत: ६०३ (महेंद्रसिंग धोणी-१४८, राहुल द्रविड-१०३*)
दुसरा डाव
संपादन- पाकिस्तान: ८ बाद ४९० घोषित (युनिस खान-१९४, मोहम्मद युसुफ-१२६*, झहीर खान-४/६१)
- भारत: बिनबाद २१
निकाल
संपादनसामना अनिर्णित.