क्रिकेट ह्या खेळात, क्रिकेट खेळपट्टी म्हणजे क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी विकेटच्या मधील एक २०.१२ मी (२२ यार्ड) लांब आणि ३.०५ मी (१० फूट रुंद) पट्टी होय. खेळपट्टीचा पृष्ठभाग हा सपाट आणि सामान्यत: खुरट्या गवताने अाच्छादलेला असतो.

क्रिकेट खेळपट्टी

जगात काही ठिकाणी हौशी सामन्यांसाठी कृत्रिम खेळपट्टी वापरली जाते. ही खेळपट्टी म्हणजे काथ्याची मॅट किंवा कृत्रिम टर्फ अंथरलेल्या कॉंक्रीटच्या स्लॅबपासून बनवलेली असते, काही वेळा काथ्याच्या मॅट किंवा चटईवर ती अस्सल खेळपट्टी वाटावी म्हणून माती टाकतात. परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृत्रिम खेळपट्टी दुर्मिळ आहे. ज्या ठिकाणी क्रिकेट सामान्यतः खेळले जात नाही अशा ठिकाणी एखादा प्रदर्शनीय सामना अशी खेळपट्टीवर खेळवला जातो.

खेळपट्टीवर क्रिकेटच्या नियमांमध्ये निर्देशत केल्याप्रमाणे क्रीज आखलेले असतात.

विकेट हा शब्द साधारणपणे खेळपट्टीच्या संदर्भात उद्भवतो. परंतु क्रिकेटच्या नियमांनुसार (नियम ७ मध्ये खेळपट्टी आणि नियम ८ विकेट, त्यामधील फरक दर्शवतात) तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. क्रिकेट खेळाडू, चाहते आणि समालोचक त्याचा वापर कोणत्याही शक्य संदिग्धतेशिवाय संदर्भांमध्ये करतात. ट्रॅक हा खेळपट्टीसाठी आणखी एक समानार्थी शब्द आहे.

क्रिकेटमैदानाच्या मध्यभागी खेळपट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेत्राला स्क्वेअर असे म्हणतात. क्रिकेटची खेळपट्टी ही सहसा व्यावहारिकदृष्ट्या दक्षिणोत्तर दिशेने असते, कारण तसे नसल्यास दुपारच्यावेळी सूर्यामुळे पश्चिमेकडे तोंड असलेल्या फलंदाजाला ते त्रासदायक वाटू शकते.[]

संरक्षित क्षेत्र

संपादन
 
तीन यष्ट्या असलेली विकेट जी मैदानावर ठेवलेली असते आणि त्यावर दोन बेल्स ठेवलेल्या असतात.

संरक्षित क्षेत्र किंवा धोकादायक क्षेत्र म्हणजे खेळपट्टीचा मधला भाग, हा एक दोन फूट रुंदीचा आयताकार असतो, आणि दोन्ही पॉपिंग क्रीजच्या पाच फुटांपासून सुरू होऊन खेळपट्टीच्या मध्यापर्यंत जातो. क्रिकेटच्या कायद्यानुसार, चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाने ह्या क्षेत्रातून धावत जाणे टाळणे गरजेचे आहे.

खेळाची निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी खेळपट्टी सुरक्षित ठेवली जाते. जेव्हा एखादा गोलंदाज खेळपट्टीवर मागोवा घेतो, तेव्हा तो खेळपट्टीवर असा पॅच तयार करतो की ज्यामुळे चेंडूला अनपेक्षित स्विंग आणि बाउन्स मिळतो. गोलंदाजांकडून सामन्याचा निकाल बदलण्यासाठी या क्षेत्रांचा वापर केला जाऊ शकतो. एखादा गोलंदाज संरक्षित क्षेत्रावरून धावल्यास, पंच गोलंदाज आणि त्याच्या संघाच्या कर्णधार यांना ताकीद देताता. गोलंदाजाने पुन्हा एकदा तसे केल्यास पंच त्यांना एक दुसरी आणि शेवटची चेतावणी देतात. याची तिसऱ्यांदा पुनरावृत्ती झाल्यास पंचांकडून गोलंदाजाला बाहेर काढले जाते आणि उर्वरित डावासाठी तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही.[]

संरक्षित क्षेत्राची अशा प्रकारची आखणी यासाठी केलेली असते की, साधारणतः याच क्षेत्रात चेंडूचा टप्पा पडतो. आणि जर हे क्षेत्र गोलंदाजाच्या पायाच्या ठशांमुळे खराब झाले तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा गैरफायदा मिळू शकतो. गोलंदाज किंवा इतर कोणताही खेळाडूला ह्या क्षेत्रावरून धावत जाऊन क्षेत्ररक्षण करण्यास हा नियम मज्जाव करत नाही, फक्त गोलंदाजाच्या फॉलो-थ्रू साठी हा नियम लागू होतो.

खेळपट्टीची स्थिती

संपादन
 
गोलंदाजाच्या टोकाकडून क्रिकेट खेळपट्टीचे यथार्थ दृश्य. खेळपट्टीच्या एका टोकाकडून गोलंदाज एकतर 'ओव्हर' द विकेट किंवा 'राऊंड' द विकेट गोलंदाजी करतो.

ज्या नैसर्गिक खेळपट्टीवर नेहमीपेक्षा मोठे गवत असेल किंवा जास्त ओलसर असेल, त्या खेळपट्टीचे वर्णन हिरवी खेळपट्टी किंवा किंवा ग्रीन सीमर म्हणून केले जाते.[] ओलसर आणि मोठे गवत असलेल्या ह्या खेळपट्टीवर चेंडू विचित्र प्रकारे उसळी घेत असल्याने ही फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना जास्त मदत करते. बहुतांश क्लब आणि सामाजिक क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट खेळाडू ज्या खेळपट्टीला हिरवी म्हणतात, त्यावर खेळतात.

स्टिकी खेळपट्टी – जी खेळपट्टी ओली झाल्यानंतर, कडक उन्हामुळे वेगाने वाळते – त्या खेळपट्टीची धीम्या गतीच्या आणि फिरकी गोलंदाजांना चांगली मदत होते. तथापि, आधुनिक खेळपट्टी सामान्यतः पाऊस आणि दंवापासून सामन्याआधी आणि सामन्यादरम्यान सुरक्षित ठेवल्या जातात, त्यामुळे प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये स्टिकी खेळपट्टी क्वचितच दिसून येते. परंतु हा वाक्प्रचार क्रिकेट ऐवजी इतर ठिकाणी कठीण परिस्थिती ह्या अर्थी वापरला जातो.[]

सामना जसजसा पुढे सरकतो, तशी खेळपट्टी सुकत जाते. क्रिकेटच्या नियमानुसार सामना सुरू असताना खेळपट्टीवर पाणी मारण्यास मज्जाव असतो. खेळपट्टी सुकत गेल्याने ओलावा निघून जातो आणि फलंदाजी करणे सोपे होते. चार किंवा पाच दिवसीय सामन्यात, खेळपट्टीला चरे पडत जातात, त्यामुळे खेळपट्टी खराब आणि धूलिमय होत जाते. अशा प्रकारच्या खेळपट्टीला 'डस्ट बाऊल' किंवा 'माइनफील्ड' असे म्हणले जाते. अशी खेळपट्टीही गोलंदाजांना आणि त्यातही फिरकी गोलंदाजांना मदत करते.

नाणेफेक जिंकणारा कर्णधार, कोणत्या संघाने प्रथम फलंदाजी करावी याचा निर्णय घेताना एक धोरण म्हणून, सामन्यादरम्यान खेळपट्टीमध्ये होणाऱ्या ह्या बदलांना लक्षात घेतो आणि त्यानुसार निर्णय घेतो.

न झाकलेल्या खेळपट्ट्या

संपादन

सुरुवातीला झाकून न ठेवलेल्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळवले जाई. खेळपट्टी झाकून ठेवण्याची सुरुवात १९७० च्या दशकात झाली.[]

खेळपट्टी झाकणे

संपादन
 
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर येथील हॉवर कव्हर

पाऊस आणि दंवापासून खेळपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राउंडमन खेळपट्टी झाकून घेतात. कव्हर्सचा वापर केल्याने किंवा न केल्याने खेळपट्टीवरून फलंदाजाकडे चेंडू कसा येईल ह्यावर मोठा परिणाम होत असतो, ज्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो. क्रिकेट नियमावलीमधील ११व्या नियमाप्रमाणे नाणेफेकीआधी करार झाल्यास किंवा नियम असल्यासच क्रिकेटच्या सामन्यादरम्यान खेळपट्टी संपूर्णतः झाकली जाऊ शकते. शक्य असेल तेव्हा हवामानाचा अंदाज घेऊन गोलंदाजाच्या धावण्याची जागा कोरडी ठेवण्यासाठी झाकली जाऊ शकेते. रात्रीच्यावेळी खेळपट्टी झाकली गेल्यास सकाळी खेळ सुरू होण्याच्या आधी शक्य तितक्या लवकर खेळपट्टीवरचे कव्हर्स काढले जातात. जर हवामानामुळे कव्हर्स घातले गेले किंवा खराब हवामानामुळे रात्री घातलेले कव्हर्स सकाळी काढण्यास उशीर झाल्यास, हवामान सुधारल्यानंतर कव्हर्स लगेच काढले जातात. वॉटर हॉग मशीनच्या सहाय्याने खेळपट्टी किंवा बाह्यमैदानावरील जास्तीचे पाणी काढता येते.[]

खेळपट्टीची तयारी आणि देखभाल

संपादन

क्रिकेट कायद्यांमधील कायदा क्र. १० मध्ये खेळपट्टी तयार करणे आणि तिच्या देखभालीसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

खेळपट्टी रोलिंग

संपादन

सामन्यादरम्यान, फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार, डाव सुरू होण्याआधी (सामन्याच्या पहिल्या डावाव्यतिरिक्त) आणि सामन्याच्या इतर दिवसांच्या सुरुवातीस, खेळपट्टीवर जास्तीत जास्त ७ मिनिटांपर्यंत रोलर फिरविण्याची विनंती करू शकतो. याव्यतिरिक्त, नाणेफेकीनंतर सामन्याच्या पहिल्या डावापूर्वी जर सुरुवातीला उशीर होत असेल तर फलंदाजी संघाच्या कर्णधार जास्तीत जास्त ७ मिनिटे खेळपट्टीवर रोलर फिरविण्याची विनंती करू शकतो. परंतु होणाऱ्या विलंबामुळे खेळपट्टीवर लक्षणीय परिणाम होणार नसेल तर पंचांच्या सहमतीने रोलर न फिरविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. एकदा खेळ सुरू झाला की विशेष परिस्थितीशिवाय इतरवेळी रोलर फिरवण्याची अनुमती नसते.

एका सामन्यात, एकापेक्षा अधिकवेळा रोलर फिरवण्याची परवानगी असल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला तसे करण्याची संधी दिली जाते. शक्य असल्यास सामन्याला विलंब न लावता रोलिंग करण्याबाबत आणि गरज असल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधारास हवे असल्यास जास्तीत जास्त ७ मिनिटांच्या रोलिंगसाठी विशिष्ट नियम अस्तित्वात आहेत. खेळपट्टी रोलिंगसाठी बराच वेळ लागतो, परंतु पूर्ण झाल्यानंतर ती फारच प्रभावी होते. खेळपट्टी रोलिंग करणे हे एखाद्या फलंदाजासाठी किंवा गोलंदाजासाठी चांगले असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

२०१० काऊंटी चॅम्पियनशिप दरम्यान खेळपट्टीवर जड रोलर फिरवण्यास मनाई करण्यात आली होती. जड रोलर्समुळे खेळपट्टी सपाट होऊन अनेक सामने अनिर्णित राहतात असा तेव्हा समज होता.[]

झाडलोट

संपादन

खेळपट्टीवर रोलर फिरविण्याआधी, खेळपट्टीवरील कचरा रोल होऊन खेळपट्टीला होणारा धोका टाळण्यासाठी खेळपट्टीची झाडलोट केली जाते. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला तसेच जेवणाच्या वेळेत आणि दोन डावांदरम्यानसुद्धा खेळपट्टी झाडली जाते. याला एकमात्र अपवाद म्हणजे खेळपट्टीचा एखादा पृष्ठभाग जर पंचांच्या मते झाडलोट केल्यास हानिकारक असेल तर.

कापणी

संपादन

ज्या दिवशी खेळ होणार असेल अशा प्रत्येक दिवशी ग्राउंडमन (क्रीडांगणाची देखभाल करण्यासाठी नोकर) खेळपट्टीवरील गवताची कापणी करतो. एकदा सामना सुरू झाल्यानंतर ही कापणी पंचांच्या देखरेखीखाली होते.

फूटहोल्स आणि फूटहोल्ड्स

संपादन

मैदान खेळण्याजोगे बनवण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांमुळे खेळपट्टीवर झालेले फुटहोल्स पंचांनी दुरुस्त करून घेणे गरजेचे असे. एकापेक्षा जास्त दिवसाच्या सामन्यात गोलंदाजांमुळे झालेल्या फुटहोल्स मध्ये भराव टाकून ती जागा खेळासाठी सुरक्षित करणे गरजेचे असते. खेळाडू सुद्धा त्यांचे फुटहोल्स माती टाकून सुरक्षित करु शकतात, परंतु असे करताना दुसऱ्या संघासाठी ते चुकीचे ठरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.

मैदानावरील सराव

संपादन

सामन्याच्या कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी नियमानुसार, खेळपट्टी, खेळपट्टीला समांतर जागी तसेच मुख्य खेळपट्टीच्या बाजूच्या खेळपट्टीवर गोलंदाजी किंवा फलंदाजीच्या सरावासाठी परवानगी नसते. सामन्याच्या दिवशी मैदानाच्या इतर भागात सरावाची मुभा दिली जाते. परंतु सदर सराव सामना सुरू होण्याआधी ३० मिनिटेपर्यंत थांबवावा लागतो आणि सामना संपल्या नंतर ३० मिनिटांनी सुरू केला जाऊ शकतो.

सामन्यादरम्यान, खेळाडू सहसा मैदानावर परंतु क्रिकेटच्या चौकटी बाहेर सराव करतात. तसेच, गोलंदाज काहीवेळा सामन्यादरम्यान रन-अपचा सराव करतात. परंतु, जर वेळ वाया जात असेल तर असा सराव किंवा रन-अपची परवानगी दिली जात नाही. मैदानावर करावयाच्या सरावाबाबतीचे नियम क्रिकेट नियम १७ मध्ये सांगितले गेले आहेत.

सामान्य खेळपट्ट्या

संपादन

जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये खेळपट्ट्यांची विविध वैशिष्ट्ये आहेत. खेळपट्टीचे स्वरूप प्रत्यक्ष खेळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते: संघ निवड आणि इतर पैलूंवर तिचा लक्षणीय प्रभाव असतो. भारतीय उपखंडात फिरकी गोलंदाजांना पसंती असते, जेथे कोरड्या खेळपट्ट्या (विशेषतः पाच दिवसांच्या कसोटी सामन्याच्या शेवटी) फिरकीपटूंना मदत करतात. तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी खेळपट्टी उसळती असल्याने तेजगती गोलंदाजी वापरली जाते.

इंग्लंड आणि वेल्समधील खेळपट्ट्या

संपादन

मुख्यता हवामानावर अवलंबून असणाऱ्या हिरव्या, स्विंगला उत्तेजन देणाऱ्या आणि आर्द्रतायुक्त परिस्थिती असलेल्या असे इंग्रजी खेळपट्ट्यांच्या बांधकामाचे वर्णन करता येते. हंगामाच्या सुरुवातीस, बहुतेक फलंदाजांना खूपच काळजीपूर्वक खेळावे लागते कारण इंग्लिश खेळपट्ट्या ह्या येथील हवामानाप्रमाणे फारच चपळ असतात. नंतर उन्हाळ्यामध्ये, खेळपट्ट्या जास्त टणक होतात आणि त्यांच्यावरील हिरवळ कमी होऊन फलंदाजी करणे सोपे होते. हंगामाच्या पहिल्या सहामाहीत फिरकी गोलंदाज कमी प्रभावी ठरतात आणि त्यांचा खरा खेळ दुसऱ्या सहामाहीत सुरू होतो. दमट हावामान व थोडी धूळ ह्यामुळे ५०-षटके जुन्या चेंडूसह रिव्हर्स स्विंगच्या सरावासाठी ही मैदाने आदर्श मानली जातात.

ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या

संपादन

खेळपट्टीच्या पृष्ठभागाच्या बाऊन्स निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पारंपरिक पद्धतीने वेगवान गोलंदाजांसाठी चांगल्या मानल्या जातात. विशेषतः पर्थमधील वाका मैदानावरील खेळपट्टी ही कदाचित जगातील सर्वात जलद खेळपट्टी मानली जाते. ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीदेखील, वेगवान गोलंदाजांना त्याच्या उसळीसाठी साहाय्य करणारी म्हणून ओळखली जाते. तथापि, अशा प्रकारच्या उसळी देणाऱ्या खेळपट्ट्यादेखील धावा करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देतात, कारण ह्या खेळपट्ट्यांवर पुल, हूक आणि कट शॉट्स खेळण्यास प्रोत्साहन मिळते. असे फटके चांगले खेळणाऱ्या फलंदाजांना या खेळपट्ट्यांवर भरपूर यश मिळू शकते.
ॲडलेड ओव्हल आणि सिडनी क्रिकेट मैदानासारख्या इतर स्टेडियमवरील खेळपट्ट्यांवर अधिक धूळ असल्याने त्या फिरकी गोलंदाजांना सहाय्य करण्यासाठी ओळखल्या जातात. यामुळे ही मैदाने फलंदाजांसाठी नंदनवन अशी आहेत; ज्यामुळे संघ पहिल्या डावात सरासरी ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढू शकतात. मेलबर्न क्रिकेट मैदान सुरुवातीला तेजगती गोलंदाजांना साहाय्य करतात, सामना जसजसा पुढे जातो तसतसा गोलंदाजांचा प्रभाव कमी होत जातो.
ऑस्ट्रेलियात स्विंग बॉलिंग एक शस्त्र असू शकते, परंतु इंग्लंडच्या तुलनेत भारतीय उपमहाद्वीपाप्रमाणेच हे बरेचदा हवामानावर अवलंबून आहे.

भारतातील खेळपट्ट्या

संपादन

भारतातील खेळपट्ट्या ह्या पूर्वीपासूनच सीम किंवा स्विंग गोलंदाजी ऐवजी फिरकी गोलंदाजीस मदत करत आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेमधील खेळपट्ट्या

संपादन

न्यू झीलंडमधील खेळपट्ट्या

संपादन

वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्या

संपादन

पाकिस्तानमधील खेळपट्ट्या

संपादन

बांगलादेशमधील खेळपट्ट्या

संपादन

श्रीलंकेतील खेळपट्ट्या

संपादन

झिम्बाब्वेमधील खेळपट्ट्या

संपादन

संयुक्त अरब अमिरातीमधील खेळपट्ट्या

संपादन

खेळपट्टीला 'धोकादायक' किंवा 'अपात्र' ठरविण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "ओरिएंटेशन ऑफ आऊटडोअर प्लेइंग एरियाज" (इंग्रजी भाषेत). 2014-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-21 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |अ‍ॅक्सेसदिनांक= and |access-date= specified (सहाय्य)
  2. ^ "क्रिकेटचे नियम: नियम ४२" (इंग्रजी भाषेत). १८ मे २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ बॅरेट, ख्रिस. "ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटीसाठी होबार्टच्या खेळपट्टीचा ग्रीन सीमर लुक".
  4. ^ a b "क्रिकेटमधील तांत्रिक शब्द". २२ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "क्रिकेटचे टर्निंग पॉइंट्स: झाकलेल्या खेळपट्ट्या | हायलाईट्स | क्रिकइन्फो मासिक" (इंग्रजी भाषेत). २२ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "इंग्लिश काऊंटीमध्ये जड रोलर्सवर बंदी" (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.