फुलंब्री विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ - १०६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, फुलंब्री मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील १. फुलंब्री तालुका आणि २. औरंगाबाद तालुक्यातील चौका, लाडसावंगी, करमाड ही महसूल मंडळे आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.९ ते १३ यांचा समावेश होतो. फुलंब्री हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे हरिभाऊ किसनराव बागडे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ हरिभाऊ किसनराव बागडे भारतीय जनता पक्ष
२०१४ हरिभाऊ किसनराव बागडे भारतीय जनता पक्ष
२००९ कल्याण वैजनाथराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".