फीनिक्स (ॲरिझोना)
अमेरिका देशातील अॅरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर
(फीनिक्स, ॲरिझोना या पानावरून पुनर्निर्देशित)
फीनिक्स हे अमेरिका देशातील अॅरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे १५ लाख शहर लोकसंख्या व ४० लाख महनगर लोकसंख्या असलेले फीनिक्स शहर ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात सोनोराच्या वाळवंटामध्ये वसलेल्या फीनिक्स शहराचे हवामान अत्यंत रुक्ष व उष्ण आहे.
फीनिक्स Phoenix |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | अॅरिझोना |
स्थापना वर्ष | ५ फेब्रुवारी, इ.स. १८८१ |
महापौर | फिल गॉर्डन |
क्षेत्रफळ | १,३३४.१ चौ. किमी (५१५.१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,११७ फूट (३४० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १४,४५,६३२ |
- घनता | १,१८८ /चौ. किमी (३,०८० /चौ. मैल) |
- महानगर | ४१,९२,८८७ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ७:०० |
http://www.phoenix.gov |
खेळ
संपादनखालील चार व्यावसायिक संघ फीनिक्स महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले फीनिक्स हे १२ पैकी एक शहर आहे.
संघ | खेळ | लीग | स्थान |
---|---|---|---|
अॅरिझोना कार्डिनल्स | अमेरिकन फुटबॉल | नॅशनल फुटबॉल लीग | युनिव्हर्सिटी ऑफ फीनिक्स स्टेडियम |
फीनिक्स सन्स | बास्केटबॉल | नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन | यू.एस. ऐअरवेज सेंटर |
फीनिक्स कोयोटीज | आइस हॉकी | नॅशनल हॉकी लीग | जॉबिंग.कॉम अरेना |
अॅरिझोना डायमंडबॅक्स | बेसबॉल | मेजर लीग बेसबॉल | चेस फील्ड |
वाहतूक
संपादनफीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे. अमेरिकेमधील इंटरस्टेट १० हा प्रमुख इंटरस्टेट महामार्ग फीनिक्स शहरामधून जातो.
गॅलरी
संपादन-
शहर केंद्र
-
यु.एस. एअरवेज दालन
-
नागरी दालन
-
अरिझोना राज्य संसद भवन
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |