फिलिप मॉरिसन
फिलिप मॉरिसन (७ नोव्हेंबर, १९१५:सॉमरव्हिल, न्यू जर्सी, अमेरिका - २२ एप्रिल, २००५:कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान मॅनहॅटन प्रकल्पावर काम केले होते. त्या नंतर त्यांनी क्वांटम विज्ञान आणि परमाणुशास्त्रात संंशोधन केले. हे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्राध्यापक होते. [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]