केंब्रिज (मॅसेच्युसेट्स)
(कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
केंब्रिज (इंग्लिश: Cambridge) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या बॉस्टन महानगर क्षेत्रामधील एक शहर आहे. २०१० साली १.०५ लाख लोकसंख्या असलेले केंब्रिज हे मॅसेच्युसेट्स राज्यातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर आहे.
केंब्रिज Cambridge |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | मॅसेच्युसेट्स |
स्थापना वर्ष | इ.स. १६३० |
क्षेत्रफळ | १८.४७ चौ. किमी (७.१३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४० फूट (१२ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,०५,१६२ |
- घनता | ६,३४२ /चौ. किमी (१६,४३० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
cambridgema.gov |
केंब्रिज शहर येथील एम.आय.टी व हार्वर्ड विद्यापीठ ह्या जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठांकरिता प्रसिद्ध आहे. चार्ल्स नदी केंब्रिजला बॉस्टनपासून वेगळे करते. ही दोन्ही विद्यापीठे चार्ल्स नदीकाठावरच स्थित आहेत.
मॅसेच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन ऑथोरिटी ही नगर वाहतूक संस्था केंब्रिज शहरात नागरी वाहतूक चालवते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत