फिलिपाईन एरलाइन्स

फिलिपाईन एअरलाइन्स
(फिलिपाईन एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फिलिपाईन एरलाइन्स (टागालोग: Philippine Airlines) ही आग्नेय आशियातील फिलिपिन्स ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४१ साली स्थापन झालेली फिलिपाईन एरलाइन्स आशियामधील सर्वात जुनी विमानकंपनी आहे. फिलिपाईन एरलाइन्सचे मुख्यालय पासाय ह्या शहरात तर प्रमुख हब मनिलाच्या निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. आज, २०१५ साली फिलिपाईन एरलाइन्स ही कंपनी देशांतर्गत ३१ तर देशाबाहेरील ३६ शहरांना प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरवते.

फिलिपाईन एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
PR
आय.सी.ए.ओ.
PAL
कॉलसाईन
PHILIPPINE
स्थापना २६ फेब्रुवारी १९४१
हब निनॉय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे सेबू सिटी
कालिबो
फ्रिक्वेंट फ्लायर माबुहे माइल्स
उपकंपन्या पाल एक्सप्रेस
विमान संख्या ७५
गंतव्यस्थाने ७७
ब्रीदवाक्य Your Home in the Sky
मुख्यालय पासाय, फिलिपिन्स
संकेतस्थळ http://www.philippineairlines.com/
मेलबर्न विमानतळावरून उड्डाण केलेले फिलिपाईन एरलाइन्सचे एअरबस ए३३० विमान

प्रस्तावना

संपादन

ही विमान कंपनी पल या संक्षिप्त नावाने आणि फिलिपाईन एअरलाईन या नावाने बराच काळं ओळखली जात होती. या एअरलाईनच्या ध्वजावर वायुसेवा हे चिन्ह आहे. या एअरलाईनचे मुख्य कार्यालय, फिलिपाईन्स देशाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या, पैसे या शहरातील राष्ट्रीय बँकेच्या केंद्रात आहे.[]

या विमान कंपनीची स्थापना सन १९४१ मध्ये झाली. फिलिपाईन एअरलाईन नावाने चालणारी ही सर्वात पहिली व जुनी व्यापारी कंपनी आहे.. या विमान कंपनीची अन्य कार्यालये मनिला शहरात निनोय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे, तर सेबू शहरातले कार्यालय माइकटेन-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. या विमानतळांवरून फिलिपाईन्समधील ३१ ठिकाणी आणि आग्नेय आशियातील देश, मध्य-पूर्व ओशॅनिया, उत्तर अमेरिका, आणि युरोपसह ३६ इतर देशाना विमानसेवा देली जात आहे.[]

आशिया खंडातील सर्वात जुनी असणारी ही कंपनी सन १९९७ मध्ये फार मोठ्या संकटात सापडली होती. ही कंपनी इतर विमान कंपन्याशी संमीलित असल्याने त्यांच्या नियोजनाप्रमाणे हिला युरोप, मध्य पूर्व, तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा नाईलाजाने कमी कराव्या लागल्या होत्या. मनिला या नियंत्रण कक्ष-मार्गातील विमान सेवा सोडून देशांतर्गत सेवा, तसेच कर्मचारी आणि आरमारी विमानसेवा इत्यादी कमी करणे यासारखे निर्णय घ्यावे लागले होते. सन १९९८मध्ये हळूहळू कांही ठिकाणची ही सेवा काही प्रमाणात नियंत्रणमुक्त करण्यात आली. सन २००७ मध्ये ही विमान सेवा (पल) पूर्णपणे नियंत्रणमुक्त झाली.

सन २०१२ साली सेंन मिगुएल निगमने ताब्यात घेतल्यानंतर ही कंपनी, आशिया खंडातील एक प्रमुख विमान सेवेच्या रूपात पुन्हा कार्यान्वित होण्याच्या दिशेने पावले टाकू लागली.

इतिहास

संपादन

दि. १४-११-१९३५ रोजी फिलीपाइन्स कोंग्रेसने लुजण बेटावर टपाल, माल, व प्रवासी वाहतूक या सेवांसाठी फिलीपाईन हवाई टॅक्सी कंपनीला मंजूरी दिली. या विमान कंपनीने त्यानंतर मनिला – बगुइओ आणि मनिला – पेराकोल ही उड्डाणे निश्चित केली. या ठरविलेल्या मार्गांवर अनेक अडचणी आल्याने ती उड्डाणे ६ वर्षांत निष्क्रिय झाली.[]

फिलिपाईन एअरलाईन

संपादन

फिलिपाईन्स देशातील व्यापाऱ्यांच्या एका संघटनेने देशाचे माजी अध्यक्ष व एक प्रमुख उद्योगपती ॲन्ड्रेस सोनारिओ, तसेच माजी सेनेटर व देशाचे अणखी एक माजी अध्यक्ष रेमन फर्नांडिस यांना या विमान कंपनीत सामावून घेतले. या कंपनीने फिलिपिन हवाई टॅक्सी कंपनी आपल्यात सम्मिलीत करून घेतली. याने या कंपनीचा उदय झाला. या कंपनीचे बीच क्राफ्ट मॉडेल 18 एन.पी.सी.-५४ या विमानाने मनिला शहरातील निल्सन फील्ड विमान तळावरून पहिली झेप घेतली आणि देशातीलच बगुइयो या शहरातील विमानंतळावर दि. १५ मार्च १९४१ रोजी उतरले.

या विमान कंपनीने दि.२२ जुलै (सन?) रोजी फिलिपाईन हवाई टॅक्सी कंपनीचे सर्व हक्क ताब्यात घेतले.

सरकारी वटहुकूमाने माहे सप्टेंबर (सन?) मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण होण्यासाठी सर्व मार्ग खुले झाले.

मबुहाय विश्राम कक्ष

संपादन

फिलिपाीन विमान कंपनीचे विमानतळावर'मबुहाय' विश्राम कक्ष आहेत. मबुहाय, विशेष वर्ग आणि व्यावसायिक वर्ग यांचेसाठी ही व्यवस्था आहे. मात्र पलच्या अन्य प्रवाशांनी याचा वापर करावयाचा नाही असा दंडक आहे. या विश्राम कक्षात मदिरा हॉल तसेच खानपान व्यवस्था आहे.

खालील विमानतळांवर विश्राम कक्ष आहेत.[]

  1. मनिला
  2. सेबू
  3. लोइलो
  4. दाओ
  5. सॅन फ्रान्सिस्को
  6. लॉस एंजेलस
  7. जनरल संतोस

बसण्याची व्यवस्था

संपादन
  1. विमानात उच्च श्रेणी वर्ग तसेच इकॉनॉमी वर्ग आहेत.
  2. बैठका (खुर्च्या) आकारमानाने वाढविलेल्या आहेत.
  3. प्रवाश्यांच्या मागणीनुसार स्क्रीनवर व्हीडिओ/ऑडिओ व्यवस्था केली जाते.
  4. खानपान व्यवस्था आहे.
  5. फर्स्ट क्लास श्रेणी वर्गात ऑडिओने मनोरंजन केले जाते.

अपघात / घटना []

संपादन
  1. पल विमानसेवेच्या सुरुवातीच्या काळात कांही अपघाताच्या घटना घडल्या.
  2. अल कायदा संघटनेने F 434 या विमानात एक स्फो घडविला.

कुतूहल

संपादन

आंतरराष्ट्रीय विमान परिवहन संघटनेने ( IATA ने), फेब्रुवारी २००७मध्ये, या कंपनीची सुरक्षित सेवा देणारी एअरलाईन अशी शिफारस केली आहे. ऑपरेशनल सेफ्टी ऑडिट विभागानेही ते मान्य केले आहे. []

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "संचालक मंडळ" (इंग्लिश भाषेत). 2014-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "पाल फाउंडेशन" (इंग्लिश भाषेत). 2015-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "पाल इतिहास" (इंग्लिश भाषेत). 2000-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "फिलिपाईन एअरलाईन" (इंग्लिश भाषेत). 2015-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "यूसफ बॉम्ब्स फिलिपिन्स विमान 434" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "महत्त्वाचे टप्पे" (इंग्लिश भाषेत). 2015-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन