ताओ
(दाओ या पानावरून पुनर्निर्देशित)
ताओ वा दाओ (चिनी: 道; पिन्यिन: Dào) ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो. पारंपरिक चिनी तत्त्वज्ञान व धर्म यांच्या संदर्भात ताओ ही ज्ञानमीमांसीय संकल्पना असून लाओझीपासून उद्भूत झालेल्या या संकल्पनेने एका धर्माला (Wade–Giles, Tao Chiao; Pinyin, Daojiao) आणि तत्त्वज्ञानाला (Wade–Giles, Tao chia; Pinyin, Daojia) जन्म दिला. या दोहोंना ताओ मत असे म्हणले जाते.