प्र.ल. गावडे
प्रभाकर लक्ष्मण गावडे (जन्म - २० जून १९२४ नेवासे [१], मृत्यू - ऑगस्ट २०२१ पुणे) [२] शिक्षणतज्ज्ञ, लेखक
प्रबंधाचा विषय
संपादनसावरकर: एक चिकित्सक अभ्यास.
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनपर ग्रंथास अनेक पारितोषिके मिळाली आहेत.या प्रबंधास उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुणे विद्यापीठातर्फे ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले. (१९७०) तसेच, या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला. (१९७१ - ७२). [३]
कार्यकर्तृत्व
संपादन१९६३ ते १९८२ या काळात त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६९ ते ८२ ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कला व शास्त्र महाविद्यालयात आणि १९६८ ते ७२ या काळात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक सचिव, सचिव आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. [१]
ग्रंथसंपदा
संपादन- सावरकरांचे साहित्यविचार
- कवी यशवंत - काव्यरसग्रहण
- ‘शालेय मराठी व्याकरण’
संपादित ग्रंथ
संपादन- ना.ह.आपटे यांच्या 'अजिंक्यतारा' या कादंबरीचे संपादन
- श्री तुकाराम गाथा - प्रकाशक, श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान, आळंदी
- ज्ञानेश्वरी - प्रकाशक, श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान, आळंदी
- श्री ज्ञानेश्वर वाङ्मय सूची - प्रकाशक, श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान, आळंदी
- श्रीनामदेवकृत श्री ज्ञानेश्वर समाधी अभंग - प्रकाशक, श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान, आळंदी
- संजीवन - श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवनसमाधी सप्तशताब्दीनिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेला संपादित ग्रंथ
- शारदीयेचे चंद्रकळे - आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रकाशन, पुणे
- विद्यार्थ्यांसाठी ‘साहित्यविहार’, ‘कथाकौस्तुभ’ या पुस्तकांचे संपादन
पुरस्कार
संपादनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात 'जीवनसाधना गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१]
गौरव
संपादन- डॉ.गावडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'अमृतसंचय' या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते.
- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मएसो मुलांचे विद्यालयातील (पूर्वीची भावे स्कूल) सभागृहाचे ‘गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृह’ असे नामकरण करण्यात आले आहे. [१]
संदर्भ
संपादन- ^ a b c d "ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने निधन – Maharashtra Education Society". mespune.in. 2024-02-06 रोजी पाहिले.
- ^ "ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र. ल. गावडे कालवश". Maharashtra Times. 2024-02-06 रोजी पाहिले.
- ^ "गावडे, प्रभाकर लक्ष्मण". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2024-02-06 रोजी पाहिले.