यश पाल (वैज्ञानिक)
(प्रा. यशपाल या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ यशपाल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, यशपाल (निःसंदिग्धीकरण).
यश पाल (वैज्ञानिक) | |
यश पाल (वैज्ञानिक) | |
पूर्ण नाव | यश पाल (वैज्ञानिक) |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | पद्मभूषण पुरस्कार, कलिंगा पुरस्कार, लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार |
जीवन
संपादनप्राध्यापक यशपाल (जन्म : २६ नोव्हेंबर १९२६, - नॉयडा, २४ जुलै २०१७) हे एक भारतीय वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९४९ साली भौतिकशास्त्राची पदवी मिळवली व १९५८ साली मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी मधून याच विषयात पी.एच्.डी पदवी प्राप्त केली.
महत्त्वाची पदे
संपादनयश पाल यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यातील काही मुख्य पदे पुढीलप्रमाणे आहेत :
- योजना आयोग - मुख्य सल्लागार (१९८३-१९८४)
- विज्ञान व टेक्नाॅलॉजी विभागात सचिव (१९८४-१९८६)
- विद्यापीठ अनुदान आयोग - अध्यक्ष (१९८६-१९९१)
प्रा. यशपाल हे दूरदर्शनवरील अत्यंत चर्चित विज्ञान कार्यक्रम-टर्निंग पॉईंटमधून साध्या शब्दांत सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्याच्या कामामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय झाले.
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- यशपाल यांना भारत सरकारकडून इ.स. १९७६मध्ये विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- कलिंग पुरस्कार
- लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार
- पद्मविभूषण पुरस्कार[१] (इ.स. २०१३)
मृत्यूपूर्वीचे काही दिवस आधी ते नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू होते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. "Padma Awards Announced" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |