प्रपादकीय हाडे

(प्रपादकीय हाड या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रपादकीय हाडे (इंग्रजी: Metatarsal bones) म्हणजे पादाच्या पाच लांब हाडांचा समूह आहे. हा समुह टाच आणि बोटांची हाडे या मधील जागे मध्ये स्थित असतो.

वैद्यकशास्त्र यांना वैयक्तिक नावे देताना दिसत नाही. त्या ऐवजी यांना मोठ्या बोटाच्या बाजूने म्हणजे अंगठ्याकडून क्रमांकित केले जाते पहिले प्रपादकीय , दुसरे प्रपादकीय , तिसरे प्रपादकीय , चौथे प्रपादकीय आणि पाचवे प्रपादकीय हाड. ही नावे उतरत्या क्रमाने हाडांच्या लांबीशी संबंधीत आहेत.

प्रपादकीय हाडे
प्रपादकीय हाडे

नाव संपादन

हे नाव संस्कृत उद्भव आहे असे दिसून येते. पाद म्हणजे पाय. पायाचा पुढील भाग म्हणून प्र पाद, आणि पायाचा म्हणून पादकीय. अशा रितीने प्राचीन भारतीय वैद्यकात प्रपादकीय हे नाव तयार झालेले दिसते. काहीवेळा यांचा उल्लेख प्रपदकीय असाही झालेला आढळतो.

स्वरूप संपादन

ही हाडे साधारणपणे पृष्ठीय बहिर्वक्र असतात. या हाडांची टोके पृष्ठभाग अस्थिबंधन (लिगामेंट) जोडण्यासाठी खडबडीत असतात.

जोडणी संपादन

ही हाडे स्नायू संलग्नकाने जोडलेली असतात. यात टिबिअलिस हा स्नायू पहिल्या प्रपादकीयाचा आधार आहे तर पेरोनिस हा पाचव्या प्रपादकीयाच्या पृष्ठीय बाजूचा आधार आहे. तसेच ॲडक्टर हॅल्युसिसचे खोल ट्रान्सव्हर्स मेटाटार्सल लिगामेंटशी संबंध असतो.

दुखापती व वैद्यकीय महत्त्व संपादन

प्रपादकीय (मेटाटार्सल) हाडे अनेकदा खेळाडूंद्वारे मोडतात. हे प्रपादकीय (मेटाटार्सल) हाडे सामान्य दुखापतीची ठिकाणे आहेत. प्रामुख्याने पाय लचकल्यावर करंगळीला जोडणारे पाचवे प्रपादकीय हाड मोडण्याचे प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. याला जोन्स फ्रॅक्चर (अस्थिभंग असेही म्हणतात. हे भरून यायला किमान सहा आठवडे लागतात. या काळात पायावर जोर देऊ नये. अन्यथा हाड जोडले जात नाही आणि अजून वेळ लागू शकतो.

 
पाचव्या प्रपादकीय हाडाचा अस्थिभंग

संरक्षण संपादन

पायाला पूर्ण संरक्षण देणारी पादत्राणे घातल्यास पाय मुरगाळून होणाऱ्या दुखपतीचा धोका कमी होतो.