प्रदीप प्रभाकर गोखले
डॉ. प्रदीप प्रभाकर गोखले (२ फेब्रुवारी, इ.स. १९५३:धारवाड, कर्नाटक, भारत - ) हे पुणे विद्यापीठातून निवृत्त झालेले तत्त्वज्ञानाचे माजी प्राध्यापक आहेत.
लहानपण
संपादनगोखले यांचा जन्म धारवाड, कर्नाटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर कृष्ण गोखले आणि आईचे माहेरचे नाव उषा नगरकर होते.[१]
शिक्षण
संपादन- मॅट्रीक (जुनी) १९६८ - भावे स्कूल, पेरूगेट, पुणे
- बी.ए. संस्कृत, गणित, संख्याशास्त्र १९७२ - स.प. महाविद्यालय, पुणे
- एम.ए. तत्त्वज्ञान १९७६- पुणे विद्यापीठ, पुणे -
- पीएच.डी १९८० - पुणे विद्यापीठ -
उच्च शिक्षण आणि लेखन
संपादनगोखले यांनी सुरेंद्र शिवदास बारलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्फरन्सेस ॲन्ड फॅलसीज डिस्कस्ड इन एन्शंट इंडियन लॉजिक विथ स्पेशल रेफरन्स टू न्याय ॲन्ड बुद्धिझम या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी मिळवली आहे. त्यांचा प्रबंध सत्गुरू प्रकाशनाने [१]] पुस्तकरूपात प्रसिद्ध केला आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ते भारतीय तत्त्वज्ञानातील न्यायदर्शन या विषयातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. मराठी, संस्कृत, हिंदी आणि पाली भाषांचे ते जाणकार असून मराठी आणि इंग्लिश भाषेत त्यांनी लेखन केले आहे. ते सध्या वाराणसी येथे एका प्रकल्पावर काम करीत आहेत.
अध्यापनीय कारकीर्द
संपादन- १९८० ते १९९५ : अधिव्याख्याता, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
- १९९५ : प्रपाठक,तत्त्वज्ञान विभाग पुणे विद्यापीठ, पुणे
- १९९६ ते २०१२ : प्राध्यापक, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
सन्मान पदे
संपादन- १९९२- १९९५ : अध्यक्ष- महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद
चळवळी
संपादनगोखले यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि परिवर्तनाचे प्रवर्तक प्रा. गं.बा. सरदार यांच्या प्रेरणेने विविध साहित्यिक चळवळीत भाग घेतला.
परामर्शचे संपादक
संपादनगोखले हे परामर्श (मराठी नियतकालिक) या तत्त्वज्ञानविषयक मराठी त्रैमासिकाचे बारलिंगे यांच्यानंतरचे प्रदीर्घकाळ संपादक होते.
चार्वाक विचाराचे अभ्यासक
संपादनगोखले यांनी महाराष्ट्रात सदाशिव आठवले, आ.ह. साळुंखे यांच्याप्रमाणेच चार्वाक विचारांचे पुनरुज्जीवन करण्यात पुढाकार घेतला. डॉ. प्रदीप गोखले यांच्या लेखनातून महाराष्ट्रात चार्वाक विचारांच्या चिकित्सक चिंतनाला पुनश्च सुरुवात झाल्याचे समजले जाते.
लेखन
संपादनमराठी
संपादन- चार्वाकवाद आणि अद्वैतवाद १९८९
- तत्त्वचिंतक चार्वाक, मनोविकास प्रकाशन, पुणे २०१३
- प्रेम, मरण आणि शांतता (काव्य संग्रह), १९८३
- विषमतेचा पुरस्कर्ता मनु, सुगावा प्रकाशन, १९८५
- ज्ञानदेवांचे अनुभवामृतातील तत्त्वज्ञान १९८५
इंग्लिश
संपादन- Inferences and Fallacies Discussed in Ancient Indian Logic with Special Reference to Nyaya and Buddhism(1st Edition) ISBN-13: 978-81-7030-319-0, ISBN: 81-7030-319-2[२]
- Vadanyaya of Dharmakirti, 1993 Author, editor, translator
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-31 रोजी पाहिले.
- ^ http://www.gettextbooks.com/author/Pradeep_Prabhakar_Gokhale