प्रचितगड
प्रचितगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
प्रचितगड | |
नाव | प्रचितगड |
उंची | ३००० फूट |
प्रकार | वनदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | संगमेश्वर, महाराष्ट्र |
जवळचे गाव | संगमेश्वर,दुर्गवाडी,पाते गाव |
डोंगररांग | बामणोली |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.
गडावर जाण्याच्या वाटा
संपादन- शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते.
- कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते.
- नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते.
सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती इंटरनेटवर असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात.
महत्त्वाची सुचना
संपादनचांदोली अभयारण्यातून वाट काढत जाण्यासाठी सोबत वाटाडे असणे महत्त्वाचे आहे. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हणले पाहिजे.
वैशिष्ट्य
संपादनरत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांची हद्द पार करून प्रचितगडावर पोहोचता येते व हा एक धाडसी अनुभव ठरतो.
पाहण्यासारखी ठिकाणे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- चिपळूण नगरपरिषदेच्या संकेतस्थळावरील माहीती Archived 2009-11-24 at the Wayback Machine.