कंधार डोह
कंधार डोह हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक पर्यट्न स्थळ आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात नव्याने होणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वाटेने प्रचितगडावर जाणे थोडे सोपे असले तरी नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जाता येते.
वैशिष्ट्य
संपादनकंधार डोहाची छायाचित्रे व माहिती इंटरनेटवर असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात. कंधार डोहाचा परिसर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार असून येथे बारमाही पाणी असल्याने या पाण्यासाठी जंगली श्वापदांचा या परिसरात कायम वावर असतो. वरून खाली कोसळणारे पाणी आपण नजरेने पाहूही शकत नाही एवढी येथील धबधब्याची खोली आहे. या डोहाजवळून चांदोली या मोठय़ा धरणाचा सुंदर परिसर पहायला मिळतो.
- कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते.