पोश्टर गर्ल
पोश्टर गर्ल हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून समीर पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ही हेमंत ढोमे यांची असून याची निर्मिती चलो फिल्म बनाये आणि वायकोम १८ मोशन पिक्चर्स यांनी मिळून केली आहे.[२] या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, संदीप फाटक , अक्षय टांकसाळे, सिद्धार्थ मेनन , हृषीकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला.[३]
पोश्टर गर्ल | |
---|---|
दिग्दर्शन | समीर पाटील |
कथा | हेमंत ढोमे |
पटकथा | हेमंत ढोमे |
प्रमुख कलाकार |
|
संवाद | हेमंत ढोमे |
संकलन | क्षितिजा खंडागळे |
गीते | क्षितिज पटवर्धन |
पार्श्वगायन |
|
वेशभूषा | कल्याणी गुगळे,उमा आणि बिजू |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १२ फेब्रुवारी २०१६ |
एकूण उत्पन्न | ८ करोड [१] |
प्रमुख भूमिका
संपादन- रुपाली म्हणून सोनाली कुलकर्णी
- उपसरपंच भारतराव झेंडे म्हणून जितेंद्र जोशी
- बजरंग दूधभाते म्हणून अनिकेत विश्वासराव
- सुरेश यडगावकर पाटील म्हणून संदीप फाटक
- रमेश यडगावकर पाटील म्हणून अक्षय टांकसाळे
- अर्जुन कलाल म्हणून सिद्धार्थ मेनन
- सुरज म्हणून हेमंत ढोमे
- किसनराव थोरात म्हणून हृषीकेश जोशी
- बजरंगचे वडील म्हणून आनंद इंगळे
- अर्जुनचे वडील म्हणून वैभव मांगले
कहाणी
संपादनमहाराष्ट्रातील लहान गाव - स्त्री-बालहत्यासाठी कुप्रसिद्ध असलेले परगाव-टेकवडे. परिणामी खेड्यात मुली राहिल्या नाहीत. जेव्हा मुलांच्या विवाहाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा एक सुंदर आणि हुशार मुलगी दृश्यात प्रवेश करते आणि सर्व काही बदलते. रुपाली आणि तिच्या निवडलेल्या पाच उमेदवारांची ही कहाणी आहे जी आपले मन जिंकण्यासाठी काहीही करेल.
गाणी
संपादनअनुक्रम | नाव | गीतकार | संगीत | गायक | कालावधी |
---|---|---|---|---|---|
१ | आवाज वाढवं डीजे [४] | क्षितिज पटवर्धन | अमितराज | आनंद शिंदे आदर्श शिंदे | ४.१६ |
२ | सिम्पल डिंपल | क्षितिज पटवर्धन | अमितराज | हर्षवर्धन वावरे | ३.५५ |
३ | कशाला लावतो | गुरू ठाकुर | अमितराज[५] | अमितराज व बेला शेंडे | ३.५८ |
४ | रखुमाई | वैभव जोशी | अमितराज | मृण्मयी दडके, कस्तुरी वावरे,प्रगती जोशी, रसिका गानू आणि पल्लवी तेलंगावकर | ४.५३[६] |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ कमाई
- ^ "पोश्टरगर्ल". 2016-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-01 रोजी पाहिले.
- ^ प्रदर्शन दिवस[permanent dead link]
- ^ http://www.saavn.com/s/album/marathi/Poshter-Girl-2015/MqWl5PtFfRs_
- ^ http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/Amit-Raj-has-composed-music-of-Poshter-Girl/articleshow/49254240.cms
- ^ http://www.saavn.com/s/song/marathi/Poshter-Girl/Rakumai/GVo-UEV6WnY