पोते
पोते ही ज्यूट अथवा तत्सम पारंपारिक तंतूंपासून तयार करण्यात आलेली एक मोठी पिशवी असते. सहसा, याचा उपयोग धान्य अथवा कोणतेही उत्पादन, शेती उत्पादन, खते, सिमेंट इत्यादी वस्तूंच्या साठवणूकीसाठी व वाहतूकीसाठी होतो.याने धान्य अथवा कोणतेही औद्योगिक उत्पादन याचे भंडारण करणे,ते वाहनात भरणे,त्यास खाली उतरविणे व विक्रीच्या ठिकाणावर त्यास ठेवणे व उपयोगाचे ठिकाणी नेणे आदी क्रिया सोप्या होतात. याची धारकक्षमता साधारणपणे २० किलो ते १०० किलो इतकी असू शकते.
ज्यूटचे धागे वापरून तयार केलेले पोते हे पर्यावरणपूरक व जैवविघटित होणारे असते.पण यावर ओलाव्याचा परिणाम होतो.
सध्या पोते पॉलिप्रॉपेलिन अथवा तत्सम कृत्रिम धाग्यांपासूनही तयार करण्यात येतात.ती सहसा, पर्यावरणपूरक असत नाहीत पण यावर थोड्याशा ओलाव्याचा परिणाम होत नाही.
मका आदींच्या तंतूंपासून पर्यावरपूरक पोती तयार करण्यात येतात.[ संदर्भ हवा ]
प्रकार
संपादनवेगवेगळ्या प्रकारचे धान्य अथवा वस्तू साठविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पोती (पोत्याचे अनेकवचन) बनविण्यात येतात. धान्याचा अथवा वस्तूचा आकार (ग्रेन-दाण्याचा आकार) यावर ते अवलंबून असते. बारीक वस्तू,जसे तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी खते, साखर,सिमेंट यासाठी असलेल्या पोत्यांची वीण ही घट्ट असते. त्याने आतील वस्तू बाहेर गळत नाहीत. पण वांगे, कांदा, बटाटे आदी ठळक वस्तूंच्या साठवणूकीसाठी वापरण्यात येणारी पोती ही सहसा मोकळ्या विणीची असतात. त्याने या वस्तू हवेशीर राहतात व त्याचा लवकर नाश होत नाही व उष्म वातावरणाचा त्यावर परिणाम होत नाही.
पोत्याचे उत्पादनात वापरण्यात आलेल्या वस्तूनुसार त्याची उत्पादनकिंमत ठरते.
बारदाना
संपादनबारदाना ही शेतीसंदर्भातील एक संज्ञा आहे. हा पोत्यास असलेला एक हिंदीभाषिक शब्द आहे.बारा प्रकारचे दाणे ज्यात ठेवता येतात तो (बारादाना) 'बारदाना' असा त्याचा अर्थ असू शकतो.बारादानाचा अपभ्रंश मग बारदाना झाला असावा.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |