पेल्विकाक्रोमीस पल्चर

नायजेरिया आणि कॅमेरून येथे सापडणारा Cichlid (सिकलिड) गटातील Pelvicachromis pulcher (पेल्व्हिकाक्रोमिस पल्चर) हा एक गोड्या पाण्यातील मासा आहे. मत्स्यपालन छंदी लोकांमध्ये हा मासा लोकप्रिय आहे. हा सामान्यत: क्रिबॅन्सिस या नावाने विकला केली जाते. या माशाला त्याच्या रंगामुळे आणि पोटजातींमुळे आणखी बरीच नावे आहेत. क्रिब, रेड क्रिब, सुपर-रेड क्रिब आणि रेनबो क्रिब.

वर्णन

संपादन
 
समोर, अधिक रंगीबेरंगी मादी

नर क्रिबॅन्सिसचे नैसर्गिक परिसरात सुमारे १२.५ सेंटीमीटर (०.४१ फूट) लांबीपर्यंत वाढतात. त्यांचे जास्तीत जास्त वजन ९.५ ग्रॅम (०.३४ औंस) असते. मादी नरापेक्षा थोडी लहान पण फुगीर असते. मादीची कमाल लांबी ८.१ सेंमी (०.२७ फूट) असते तर वजन ९.४ ग्रॅम (०.३३ औंस) इतके असते. नर आणि मादी, दोघांच्याही अंगावर शेपटीपासून ते तोंडापर्यंत एक गडद काळ्या रंगाची पट्टी असते. नराचे पोट फिकट गुलाबी तर मादीचे गडद गुलाबी असते. काळी पट्टी आणि पोटाचा रंग हा प्रणयाराधना करताना आणि प्रजनन करतेवेळी फार गडद होतो, याच काळात माशाचा मागील कल्ला (Dorsal fin), तसेच शेपटीवरच्या कल्ल्यावरील (caudal fin) काळ्या ठिपक्याला सोनेरी रिंगण असणारे निशाणही गडद होते. एकाच ठिकाणाहून गोळा केलेल्या काही नरांमध्ये रंगांची बहुविधता आढळली आहे. अंदाजे सहा महिने वयापर्यंत पिलांमधील नर-मादी असा फरक करता येत नाही, यालाच इंग्रजी भाषेत मोनोमॉर्फिक असे म्हणतात.

वितरण, निवास आणि शिकारी

संपादन

दक्षिण नायजेरियाच्या आणि कॅमरूनच्या किनारपट्टीच्या भाग हा क्रिबॅन्सिस (पेल्व्हिकाक्क्रोमिस पल्चर ) माशाचा अधिवास आहे. सदर अधिवास उबदार असून ( २४–२६ °से or ७५–७९ °फॅ) तेथील पाणी आम्लधर्मी ते उदासीन( पीएच 5.6–6.2) पाणी असते. (12-22 मिलिग्राम एल -1 सीएसीओ 3 ). शोभिवंत माशांच्या व्यापारामुळे क्रिबॅन्सिस मासा (पी. पल्चर) त्याच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर, म्हणजेच अमेरिकेच्या हवाईमध्येदेखील आढळले आहेत.

काही मत्स्यालयाच्या साहित्यात असे सूचविले गेले की क्रिबॅन्सिस मासा अळ्या, कठीण कवच असलेले जीव (क्रस्टेशियन्स) आणि किडे खातात, [] परंतु, निसर्गात आढळणाऱ्या क्रिबॅन्सिस (पी. पल्चर) माशाच्या पोटातील अन्नाचे विश्लेषण केले असता, वरील संदर्भ हे चुकीचे आहेत हे लक्षात आले. न्वादिआरो (1985) [] यांनी केलेल्या अभ्यासानुसार, निळ्या-हिरव्या शेवाळासमवेत मुख्य खाद्यपदार्थ करड्या रंगाचे शेवाळ (डायटॉम्स), हिरवे शेवाळ, पाणवनस्पतींचे तुकडे होते. कणा नसलेले जलजीव (इन्व्हर्टेबरेट्स) जरी सेवन केले असले, तरी ते निसर्गात राहणाऱ्या इतर माश्यांच्या तुलनेत नगण्य आढळले.

लैंगिक अस्पष्टता आणि पुनरुत्पादन

संपादन
 
पी. पल्चरचे पिल्लू

वर्गीकरण

संपादन

पेल्व्हिकाक्रोमिस पल्चरचे मूळ वर्णन १९०१ मध्ये जॉर्ज बौलेन्जर यांनी पेल्मॅटोक्रोमिस पल्चर म्हणून केले होते. त्यानंतर, कित्येक कनिष्ठ समानार्थी शब्द (पेल्मॅटोक्रोमिस ऑरिओसेफ्लस, पेल्मॅटोक्रोमिस कॅमर्यूनिसिस) आणि चुकीची ओळख (पेल्मॅटोक्रोमिस क्रिबॅन्सिस, पेल्मॅटोक्रोमिस सुबोसेलाटस, क्रिबॅन्सिस आणि पेल्मॅटोक्रोमिस पल्चर) वापरले जात होते. यापैकी काही प्रतिशब्द शोभिवंत मत्स्यपालन छंदात अजूनही वापरले जात आहेत ज्यामुळे या प्रजातीची ओळख करणे गुंतागुंतीचे ठरत आहे. [] [] या प्रजातीसाठी अनेक सामान्य आणि व्यापारात वापरली जाणारी नावे आहेत, उदाहरणार्थ; क्रिबॅन्सिस, क्रिब, रेनबो क्रिब आणि चुकीचे नाव पेल्माटोक्रोमिस क्रिबॅन्सिस. </br> १९६८ साली थीस व्हॅन डेन ऑडानाएर्डे यांनी पेल्मॅटोक्रोमिस या वर्गाचे पुनःसंशोधन केले. [] त्यावेळी पी. पल्चर, यातील पी. म्हणजेच पेल्व्हिकाक्रोमिस ही वेगळी प्रजाती आहे असे ठरवण्यात आले. []

मत्स्यालयामधे

संपादन
 
पी. पल्चर प्रजातीची मादी प्रजननासाठी नराला शरीरावरील सर्व रंग गडद करून दाखवीत आहे. यात गडद गुलाबी रंगाच्या पोटाभोवतीचा गडद काळा रंग

संदर्भ

संपादन
  1. ^ मिल्स, डीक & ग्वेन वेवर (१९८९). The Tetra Encyclopedia of Freshwater Tropical Aquarium Fishes. न्यू जर्सी: Tetra Press. p. 208. ISBN 978-3-923880-89-8.
  2. ^ C. S. Nwadiaro (1985). "The distribution and food habits of the dwarf African cichlid, Pelvicachromis pulcher in the River Sombreiro, Nigeria". Hydrobiologia. 121 (2): 157–164. doi:10.1007/BF00008719.
  3. ^ Rainer Froese; Daniel Pauly (eds.). http://filaman.uni-kiel.de/Summary/speciesSummary.php?ID=7778. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Wolfgang Staeck & Horst Linke (1994). African Cichlid I: Cichlids from West Africa : A Handbook for Their Identification, Care, and Breeding. Germany: Tetra Press. ISBN 978-1-56465-166-2.
  5. ^ Robert J. Goldstein (1970). Cichlids. New Jersey: T.F.H. Publications. p. 59.
  6. ^ Anton Lamboj (2004). The Cichlid Fishes of Western Africa. Bornheim, Germany: Birgit Schmettkamp Verlag. p. 174. ISBN 978-3-928819-33-6.

बाह्य दुवे

संपादन