पेण विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
पेण विधानसभा मतदारसंघ - १९१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पेण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. सुधागड तालुका, २. पेण तालुका आणि ३. रोहा तालुक्यातील महसूल मंडळ नागोठणे आणि कोलाड ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पेण हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे रविंद्र दगडू पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | रविंद्र दगडू पाटील | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | धैर्यशील मोहन पाटील | शेतकरी कामगार पक्ष | |
२००९ | धैर्यशील मोहन पाटील | शेतकरी कामगार पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
पेण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
धैर्यशील मोहन पाटील | शेकाप | ६०,७५७ |
रविशेठ दगडू पाटील | काँग्रेस | ५३,१४१ |
अनिल दत्तात्रेय तटकरे | अपक्ष | ४९,९९२ |
हरिश्चंद्र भागूराम बेकवडे | अपक्ष | ४,६४२ |
रवींद्र बळीराम पाटील | अपक्ष | १,४५२ |
विजय केशव पाटील | अपक्ष | १,४५१ |
भिकू सीताराम राउत | बसपा | १,४३७ |
मोहन रामचंद्र पाटील | अपक्ष | १,२७४ |
रवींद्र मारुती पाटील | अपक्ष | १,२३६ |
संदीप पांडुरंग पारते | अपक्ष | ९४८ |
बल्लाळ गोविंद पुराणिक | अपक्ष | ८९६ |
रवींद्र रामचंद्र पाटील | अपक्ष | ४९९ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |