Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


पृथ्वी (संस्कृत: पृथ्वी,पृथिवी IAST: pṛúthvī,Prithvi ,इंग्रजी : Mother Earth,Gaia, Mother Nature,Pachamama) हि वैदिक देवी आहे.[१] वैदिक वेदामध्ये अकाशाची(द्यौ[२] वा द्यौष्पितृ ) यांची पत्नी आहे.[३]पृथ्वी आणि आकाश(द्यौ) प्रामुख्याने 'द्यावापृथिवी' म्हणून संबोधित केले आहेत . विश्वजगाची सर्वप्राणी जींवाची माता आहे. पालन-पोषण आईच्या स्वरूपात आहे निर्सग, प्रकृती , धन , धान्याची देवी आहे. हिंदु धर्मात विष्णुपत्नी लक्ष्मीचे स्वरूप आहे; देवी भूमी , वराह अवताराची पत्नी आहे.[४]

पृथ्वी (माता)
A Bhudevi,.JPG
मराठी पृथ्वी
निवासस्थान पृथ्वीलोक,वैकुंठ ,द्युलोक
पती विष्णु द्यौष्पिता (ऋग्वेद)
अपत्ये मंगल व नरकासुर
अन्य नावे/ नामांतरे भूमि वा भुमीदेवी , भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेन्द्री, भुवीशा, अवनी, पृथ्वी, धरती, धात्री, धरणी, वसुधा, वसुंधरा
या अवताराची मुख्य देवता लक्ष्मी
मंत्र ओम भूमाय नमः
नामोल्लेख ऋग्वेद,अथर्ववेद भूमि सूक्त,पैप्पलादसंहिता
लक्ष्मी

पौरणिक कथानुसार पृथ्वी शेष नावाच्या नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली आहे, काही पुराणकथांमध्ये पृथ्वी आठ दिशांना आठ दिग्गजांनी तोलून धरली आहे, असा उल्लेख आढळतो.शांखायन आरण्यकात बहुधा यामुळेच पृथ्वीला ‘वसुमति’ म्हणजे संपत्तीने परिपूर्ण असे म्हटले आहे.[५]

व्युत्पत्तीशास्त्रसंपादन करा

भारतीय परंपरेनुसार पृथ्वी पंचमहाभूतांपैकी एक असून प्रथ् (विस्तार पावणे) या धातूवरून पृथ्वी (विस्तार पावणारी) हा शब्द आला आहे. [६]

इतर वेदात वर्णनसंपादन करा

पृथ्वी ही ऋग्वेद मध्ये द्यौष्पिताची[७] पत्नी आहे. पृथ्वीचे 'द्यावापृथिवी' नाव अनेकदा ऋग्वेद मध्ये आढळते

.ऋग्वेदः - मण्डल १० सूक्तं १०.११३[८] | ऋग्वेदः - मण्डल १० सूक्तं १०.९३[९]| ऋग्वेदः - मण्डल १ सूक्तं १.११५ [१०]| ऋग्वेदः - मण्डल ६ सूक्तं ६.७०[११] | ऋग्वेदः - मण्डल ८ सूक्तं ८.४२ [१२]| ऋग्वेदः - मण्डल ७ सूक्तं ७.५२[१३]

 • ऋग्वेदः - मण्डल १ सूक्तं १.८९[१४]

तन्नो वातो मयोभु वातु भेषजं तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः ।

तद्ग्रावाणः सोमसुतो मयोभुवस्तदश्विना शृणुतं धिष्ण्या युवम् ॥४॥

 • पैप्पलादसंहिता/काण्डम् १७[१५] आणि

अथर्ववेदः/काण्डं १२/सूक्तम् ०१ [१६]

भूमि सूक्त[१७][१८]

यामश्विनावमिमातां विष्णुर्यस्यां विचक्रमे ।

इन्द्रो यां चक्र आत्मनेऽनमित्रां शचीपतिः ।

सा नो भूमिर्वि सृजतां माता पुत्राय मे पयः ॥१०॥[१९]

अन्य नावसंपादन करा

भूमि वा भुमीदेवी , भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेन्द्री, भुवीशा, अवनी, पृथ्वी, धरती, धात्री, धरणी, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी,विष्णुपत्नि ,हिरण्मय,अम्बरस्थली,रोदसी,द्यावापृथिवी विविध नावाने ओळखतात

उपासनासंपादन करा

शांति मंत्र[२०]संपादन करा

ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः

पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः ।

वनस्पतयः शान्तिर्विश्वेदेवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः

सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

पृथ्वी स्तुतिसंपादन करा
 
Ibu Pertiwi  पृथ्वीची मूर्ती  इंडोनेशिया मध्ये

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥

अर्थ : समुद्रवस्त्र धारण करणार्‍या, पर्वतरूपी स्तन असणार्‍या आणि श्रीविष्णूची पत्‍नी (पृथ्वीदेवी), मी तुला नमस्कार करतो. पायांचा स्पर्श होणार आहे, याबद्दल तू मला क्षमा कर.[२१]

महानारायणोपनिषत्संपादन करा
 • श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ
 • स्योना पृथिवि भवान् नृक्षरा निवेशनी । यच्च्हा नः शर्म सप्रथाः ॥ ४६॥

श्रीसुक्त

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।

ईश्वरीम् सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ४७॥

बौद्ध पौराणिक कथासंपादन करा

मार (राक्षस)ने बोधी वृक्षाच्या खाली ध्यानात असलेल्या शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मार्गात अडथळा अणतो. मार (राक्षस) असुरी शक्तीचा उपयोग करुन भयानक चेहरे असलेले आणि अनेक प्रकारचे शस्त्रे पकडलेले राक्षस सेवकांना पाठवले. परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध ध्यानात शांत स्थिर असलेला, आपल्या उजवा हाताने भूमीला स्पर्श करून मग वसुंधरा प्रकट झाली तिने आपल्या केसाने पाणी प्रवाहित करून राक्षस सेवकांचा नाश केला.[२२]

दक्षिण आशियात इंडोनेशिया मध्ये Ibu Pertiwi किंवा  Phra Mae Thorani या नावाने ओळखतात. इंडोनेशिया मध्ये राष्ट्रीय व्यक्तित्व आहे.[२३]

बुद्ध धर्मात धरणी ,वसुधरा ,मण्डल, भूमि या नावाने ओळखतात

इतरसंपादन करा

पृथ्वी पुन्हा एकदा क्रोधित आहे. गेल्या २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी ही मार्च ११, इ.स. २०११ रोजी घडलेली नैसर्गिक आपत्ती होती. [२४] २५ एप्रिल : नेपाळ आणि उत्तर भारतात अतिशय मोठ्या स्वरूपाचा भूंकप झालाय. सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी हा भूकंप झालाय.[२५] रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७.६ इतकी आहे. एक भयानक स्वरुपाचा आकार घेतला.

पुन्हा एकदा पृथ्वी रौद्र रूपात् आहे असे मानवाला वाटते कि काही काळ पृथ्वीचा अंत होईल.

हे पण पहासंपादन करा

Phra Mae Thorani

Ibu Pertiwi

सतयुग

लक्ष्मी

कल्की

विष्णु


संदर्भ यादीसंपादन करा

 1. ^ "वैदिक देवता पृथ्वी : मूर्तिपूजा की परिणति - देवर्षि कलानाथ शास्त्री". Aryamantavya (इंग्रजी भाषेत). 2019-09-21 रोजी पाहिले.
 2. ^ "पैप्पलादसंहिता/काण्डम् १७ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 3. ^ "Dyaus". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-07-02.
 4. ^ "Varaha". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-19.
 5. ^ "पृथ्वी". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-22 रोजी पाहिले.
 6. ^ "पृथ्वी". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-22 रोजी पाहिले.
 7. ^ "द्यौष्पिता". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2017-02-02.
 8. ^ "ऋग्वेदः सूक्तं १०.११३ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 9. ^ "ऋग्वेदः सूक्तं १०.९३ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 10. ^ "ऋग्वेदः सूक्तं १.११५ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 11. ^ "ऋग्वेदः सूक्तं ६.७० - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 12. ^ "ऋग्वेदः सूक्तं ८.४२ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-22 रोजी पाहिले.
 13. ^ "ऋग्वेदः सूक्तं ७.५२ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 14. ^ "ऋग्वेदः सूक्तं १.८९ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 15. ^ "पैप्पलादसंहिता/काण्डम् १७ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 16. ^ "अथर्ववेदः/काण्डं १२/सूक्तम् ०१ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 17. ^ "अथर्ववेदः/काण्डं १२ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 18. ^ "Bhoomi Sukta - In sanskrit with meaning". greenmesg.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 19. ^ "पृथ्वी दिवस, अथर्ववेद में बताया है कैसे हुई धरती की उत्पत्ति". www.msn.com. 2019-09-21 रोजी पाहिले.
 20. ^ "Om Dyauha Shanti - In sanskrit with meaning". greenmesg.org. 2019-09-21 रोजी पाहिले.
 21. ^ "Samudra Vasane Devi - In sanskrit with meaning". greenmesg.org. 2018-11-22 रोजी पाहिले.
 22. ^ "Buddha and Mara". mesosyn.com. 2019-12-31 रोजी पाहिले.
 23. ^ "Prithvi". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-03.
 24. ^ "२०११ जपान भूकंप आणि त्सुनामी". विकिपीडिया. 2017-01-31.
 25. ^ "नेपाळला भूकंपाचा हादरा, उत्तरभारत दिल्लीही हादरली". News18 Lokmat. 2018-11-22 रोजी पाहिले.