पृथ्वीराज भास्करराव तौर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रा. डॉ. पृथ्वीराज भास्करराव तौर (जन्म : जालना, १४ जानेवारी १९७९) हे महाराष्ट्रातल्या नांदेड येथील ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले मराठी भाषेचे प्राध्यापक असून, १९९० नंतरच्या पिढीतील मराठी कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक आहेत.
पृथ्वीराज भास्करराव तौर | |
---|---|
जन्म नाव | पृथ्वीराज भास्करराव तौर |
टोपणनाव | बाबा |
जन्म |
१४ जानेवारी १९७९ मकरसंक्रांत जालना |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
साहित्य प्रकार | कविता, बाल साहित्य, भाषांतर, संपादन |
विषय | मराठी भाषा साहित्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | गाव आणि शहराच्या मधोमध, सृजनपंख, जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी, खजिना आनंदकथांचा, |
वडील | डॉ. बी. व्ही. तौर |
आई | स्नेहप्रभा |
पत्नी | स्वाती |
अपत्ये | रेवा, अभिराज |
व्यक्तिगत जीवन
संपादनपृथ्वीराज तौर यांचे शालेय शिक्षण 'जवाहर नवोदय विद्यालय' परतूर (जिल्हा जालना) येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद येथे झाले. [१]
कारकीर्द
संपादनमहाविद्यालयीन विद्यार्थी जीवनात त्यांनी दोन वर्षे पत्रकारिता केली. [२]
लेखन कारकीर्द
संपादनसिन्सियर सेन्सिटिव्ह, बाबा शिवणगावकर, प्रभा तौर या टोपण नावांनीही त्यांनी लेखनकेले आहे. पृथ्वीराज तौर यांनी शालेय विद्यार्थी असतानाच लेखनास प्रारंभ केला. आकाशवाणीच्या औरंगाबाद-परभणी केंद्राने १९९२ साली आयोजित केलेल्या बालकविसंमेलनात त्यांची कविता विशेष गाजली होती. त्यांची आजवर सोळा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांनी मराठीत भाषांतरित केलेल्या पोस्टर पोएट्रीज वाचकप्रिय आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी वर्तमानपत्रातून स्तंभलेखनाला प्रारंभ केला.१९९६- ९७ साली औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या विश्वमित्र या दैनिकातून दवंडी आणि सेन्सिटिव्हची डायरी" ही सदरे लिहिली. पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या किशोर या मासिकातून २०१५ साली डॉ. पृथ्वीराज तौर यांचे देशांतर्गत हे सदर प्रकाशित होत असे. बालवाचकांसाठी देशविदेशातील कथांचे भाषांतर या सदरातून प्रकाशित झाले.
दैनिक सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीसाठी त्यांनी जानेवारी ते मे २०१६ या कालावधीत हाक शांततेसाठी हे सदर लिहिले.
दैनिक 'दिव्य मराठी'च्या रसिक नावाच्या रविवार पुरवणीतून त्यांचे कवितांजली हे सदर २०१६ साली वर्षभर नियमित प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर भारतीय कवितेचे अनुवाद या लोकप्रिय सदरातून मराठीत प्रकाशित झाले.
२०१७ साली दैनिक पुण्यनगरीच्या मराठवाडा आवृत्तीमध्ये डॉ. पृथ्वीराज तौर यांचे वसुधैव कुटुंबकम हे सदर प्रत्येक बुधवारी प्रकाशित होत असते.
ग्रंथ संपदा
संपादन- आपण या पृथ्वीचा केवळ एक अंश आहोत (चीफ सिएटल यांचा पर्यावरणविषयक संदेश) - प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे जून २०१६
- खजिना आनंद कथांचा (बोधकथांचा संग्रह) - निर्मल प्रकाशन, नांदेड, २०१५
- गाव आणि शहराच्या मधोमध - शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, ऑक्टोबर २०१३
- जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी (नऊ जपानी कथांचे अनुवाद) - मासिक ऋग्वेद चिल्ड्रन्स रिलीफ फंड, आजरा (कोल्हापूर) पहिली आवृत्ती जून २०१५, दुसरी आवृत्ती २०१६, तिसरी आवृत्ती २०१७
- जादूच्या बिया (अनुवादित, मूळ कथा - मित्सुमासा ॲनो) - भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे, जून २००१
- जॉन ॲपलसीडची गोष्ट (अनुवादित, मूळ कथालेखक - अलिकी) - भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे,नोव्हेंबर, २००४
- नागनाथ कोत्तापल्ले : साहित्य स्वरूप आणि समीक्षा ( सहकार्याने) - अथर्व पब्लिकेशन्स, धुळे आणि जळगाव, ऑक्टोबर २०१४
- नाट्यवैभव (सहकार्याने) - संस्कारभारती प्रकाशन, लातूर, ऑगस्ट २००९
- फर्डिनांडची गोष्ट (अनुवादित, मूळ कथालेखक - मुनरो लिफ) - भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे, जून २००१
- बसराची ग्रंथपाल (अनुवादित, मूळ कथा - जेनिट विंटर) - भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे, ऑगस्ट २०११
- मराठी शाहिरी कविता (डॉ.मनोहर जाधव यांच्या सहकार्याने) - चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद २००९
- लेकीस पत्र (चार्ली चॅप्लीन यांचे जिराल्डीन यांना पत्र) - मैत्री प्रकाशन, लातूर नोव्हेंबर २०१६
- संयुक्त राष्ट्राची तीन वचने तुमच्यासाठी (अनुवादित, मूळ लेखक - मुनरो लिफ)- भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे, मार्च २००८
- साहित्य आणि विद्रोह - चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, जानेवारी २००८
- साहित्यजागर (सहकार्याने) - प्रतिभास प्रकाशन, परभणी, जून २००८
- सृजनपंख (स्वाती काटे यांच्या सहकार्याने) - सायन पब्लिकेशन्स प्रा. लि. पुणे, मे २०११
- होरपळलेल्या माणुसकीची कविता (जमातवाद विरोधी कवितांचे संपादन आणि अनुवाद) - दिग्राग प्रकाशन, पुणे डिसेंबर २००३
पुरस्कार
संपादन- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इ.स.२०१४ सालचा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार.
- ^ 'साहित्य काव्यगंधा जनमाध्यम' राज्यस्तरीय साहित्य संमेलनातील प्रा. तौर यांचे अध्यक्षीय भाषण
- ^ 'साहित्य काव्यगंधा जनमाध्यम' राज्यस्तरीय साहित्य संमेलनातील प्रा. तौर यांचे अध्यक्षीय भाषण
संदर्भ
https://sites.google.com/site/drprithvirajtaur/
https://www.esakal.com/nanded/dr-taurs-unique-gift-children-nanded-news-292691
http://www.srtmun.ac.in/en/schools/profiles-of-all-teaching-staff/12546-profile-96.html
http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-responsible-holidays-dr-prithviraj-taur-marathi-article-4109 Archived 2020-07-07 at the Wayback Machine.
https://www.vidyabooksabd.com/marathibhashakaushalyvikasbyprithvirajtaur/pid-142884823 Archived 2020-07-05 at the Wayback Machine.