पूर्णा नदी (गोदावरी नदीची उपनदी)
गोदावरी नदीची उपनदी
पूर्णा नदी(दक्षिण) ही मराठवाडयातील एक नदी असून गोदावरी नदी ची प्रमुख उपनदी आहे. ही नदी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातून वाहते. परभणी जिल्ह्यातील जांभूळबेट येथे गोदावरी नदीस मिळते.
पूर्णा नदी वर हिंगोली जिल्ह्यात दोन धरण उभारलेले आहे,त्यातील एक येलदरी येथे विद्युत निर्मिती केली जाते व सिधेश्वर धरणातून सिंचानासाठी कालवा काढण्यात आला आहे.
पूर्णा नदी | |
---|---|
इतर नावे | दक्षिण पूर्णा, खडकपुर्णा |
उगम | रामपुरवाडी ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर |
मुख | जांबुळबेट, गोदावरी नदी (परभणी) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | ३७३ किमी (२३२ मैल) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | 15,579 sq.Km |
उपनद्या | अंजना नदी, गिरीजा नदी, केळना नदी,दुधना नदी, कर्परा नदी |
धरणे | खडकपूर्णा धरण(बुलढाणा) येलदरी धरण(हिंगोली,परभणी),सिध्देश्वर धरण(हिंगोली) |
परभणी जिल्ह्यात नदी काठी पूर्णा हे शहर वसलेले आहे.