पुष्कर सरोवर
पुष्कर सरोवर हे पश्चिम भारतातील राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर गावात असलेले एक सरोवर आहे.हे सरोवर पंचसरोवरांपैकी एक आहे. हे हिंदूंसाठी एक पवित्र सरोवर आहे. यास तीर्थराजही म्हणतात. येथे ब्रम्हदेवाचे भारतात असणारे एकमेव मंदिर आहे. पुष्कर सरोवराचे अंकन ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील नाण्यांमध्ये अंकित आहे.[ संदर्भ हवा ] या सरोवरामध्ये डुबकी मारण्याने त्वचेचे रोग नष्ट होतात असा समज आहे. या सरोवरासभोवताल सुमारे ५०० मंदिरे आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |