पुरुषोत्तम गणेश मावळणकर
(पुरुषोत्तम मावळणकर या पानावरून पुनर्निर्देशित)
पुरुषोत्तम गणेश मावळणकर (३ ऑगस्ट, इ.स. १९२८:अहमदाबाद, गुजरात, भारत - १४ मार्च, इ.स. २००२:अहमदाबाद, गुजरात, भारत) हे भारतीय राज्यशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि खासदार होते.
हे भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग.वा. मावळणकर यांचे पुत्र असून ५व्या लोकसभेत अहमदाबाद तर ६व्या लोकसभेत गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले होते.