पुंगनुर गाय
पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जातो. आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो.[१]
शारीरिक रचना
संपादनपुंगनुर गोवंशाचा रंग हा पांढरा किंवा फिक्कट राखाडी असतो. रुंद कपाळ आणि मध्यम ते छोटी शिंगे आणि लहान पण काटक पाय असतात. दोन्ही शिंगांचा आकार एक समान नसतो. पुढील पायांपेक्षा मागील पाय लहान असतात. त्यामुळे शरीराचा आकार पुढून मागे उतरता दिसतो. शेपूट जमिनीला टेकलेली असते. या गोवंशाची उंची ७० ते ९० सें. मी. आणि वजन ११५ ते १२० किलो पर्यंत आढळते.
वैशिष्ट्य
संपादनहा गोवंश दुहेरी हेतूचा म्हणून ओळखला जातो. बैल शेतीकामासाठी उत्तम असून, गाय सुद्धा दिवसाला ३ ते ५ लिटर दूध देते. अजून दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य गायीच्या दूध फॅट ३ ते ४ टक्के असते, परंतु पुंगनुर गायीच्या दुधात ८ टक्क्यां पर्यंत फॅट आढळते.[२].
भारतीय गायीच्या इतर प्रजाती
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (हिंदी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Chandrashekhar, B. (18 November 2011). "Punganur cow a craze among the rich". द हिंदू. 19 November 2011 रोजी पाहिले.