पिवळा धोबी
पक्ष्यांच्या प्रजाती
पिवळा धोबी(इंग्रजी: Western yellow wagtail, हिंदी: पिलक्या, पिली खंजन) हा एक पक्षी आहे.
पिवळ्या धोब्याच्या काही उपप्रजाती आहेत.
- करड्या डोक्याचा धोबी किंवा भाटुकली (इंग्लिश:Dark-headed Wagtail or Grey-headed Wagtail; हिंदी:नील-सिर पीलाकिया) ही पिवळ्या धोब्याची एक उपप्रजात आहे.
- पिवळा धोबी हा आकाराने चिमणीएवढाच असतो. वरील भागाचा रंग हिरवा असून शेपटीची किनार पाढरी असते. खालील भागाचा वर्ण पिवळा असतो. डोक्याचा रंग करडा अथवा थोडासा निळसर :असतो व भुवईचा रंग पांढरा असतो. पिवळा धोबी पाकिस्तान आणि भारतात गंगेचे मैदान ते दक्षिणेकडे कच्छ्, कन्याकुमारी, श्रीलंका आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश व :अंदमान आणि निकोबार बेटे या भागात आढळून येतो.
- निळ्या डोक्याचा धोबी किंवा चिमण गांगेडा (इंग्लिश:Blue-headed Wagtail; हिंदी:नील-सिर पीलाकिया) ही पिवळ्या धोब्याची एक उपप्रजात आहे.
- या पक्ष्याचे डोके निळसर राखी रंगाचे असते. त्याची भुवई ठळक पांढरी रंगाची असते. तो पाकिस्तान,पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश आणि नेपाळचे खोरे या ठिकाणी आढळतो. तसेच भारतात गंगेच्या मैदानापासून दक्षिणेकडे :केरळ आणि श्रीलंका, निकोबार व मालदीव बेटे या भागात ते हिवाळी पाहुणे म्हणून येतात. हा धोबी दलदली, भातशेतीचा प्रदेश, तसेच विरळ शेतीचा प्रदेश, खाजनी आणि देवनळाची बेटे या ठिकाणी आढळतो.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली