पिआवी
पिआवी (ब्राझिलियन पोर्तुगीज: Piauí) हे ब्राझिल देशातील एक राज्य आहे. ते ब्राझिलाच्या ईशान्य भागात वसले आहे. समुद्रकिनारा असलेल्या ब्राझिलियन राज्यांमध्ये सर्वांत कमी, म्हणजे ६६ कि.मी. लांबीची किनारपट्टी पिआवीस लाभली आहे. तेरेसिना येथे पिआवीची राजधानी आहे.
पिआवी Piauí | |||
ब्राझीलचे राज्य | |||
| |||
ब्राझिलच्या नकाशावर पिआवीचे स्थान
| |||
देश | ब्राझील | ||
राजधानी | तेरेसिना | ||
क्षेत्रफळ | २,५१,५२९ वर्ग किमी (११ वा) | ||
लोकसंख्या | ३०,३६,२९० (१८ वा) | ||
घनता | १२.१ प्रति वर्ग किमी (२३ वा) | ||
संक्षेप | PI | ||
http://www.pi.gov.br |
पिआवीच्या आग्नेय भागात युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केलेले सेरा दा कापिवारा राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात ४००हून अधिक पुरातत्त्वस्थळे असून मोठ्या संख्येने प्रागैतिहासिक काळातील अश्मचित्रे आढळून आली आहेत.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ (पोर्तुगीज मजकूर)
- पिआवी पर्यटनाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)